RCB vs KKR Match Update : 'ऑपरेशन सिंदूर' नंतर आयपीएल 2025चा थरार पुन्हा एकदा सुरू होणार आहे. 17 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात हा सामना खेळला जाणार आहे. हा सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. पण सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे, कारण या सामन्यावर संकटाचे काळे ढग दाटून आले आहेत. शनिवारी होणाऱ्या आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यात पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.
आरसीबी-केकेआर सामना होणार का रद्द?
जर बंगळुरू आणि कोलकाता यांच्यातील सामन्यादरम्यान पाऊस पडला, तर हा सामना रद्द होऊ शकतो. यानंतर, दोन्ही संघांना 1-1 गुण दिल्या जाईल. पण जर पाऊस कमी पडला तर या सामन्यातील षटकांची संख्या कमी होऊ शकतात. कोलकाता आणि बंगळुरू यांच्यातील सामना मर्यादित षटकांचा सामना आयोजित करूनही निश्चित केला जाऊ शकतो.
बंगळुरूमध्ये हवामान कसे?
आरसीबी-केकेआर सामन्यात जोरदार वादळ येऊ शकते. आज शनिवारी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत बंगळुरूमध्ये हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कर्नाटकात काही ठिकाणी जोरदार वादळासह गारपीट होण्याची दाट शक्यता आहे.
सामना रद्द झाल्यास पॉइंट्स टेबलमध्ये होणार बदल?
जर कोलकाता आणि बंगळुरू यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला, तर केकेआरसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. कोलकाता आपला 13 वा सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळणार आहे, जर हा सामना रद्द झाला तर केकेआरला एक गुण मिळेल आणि त्यांचे 12 गुण होतील. कोलकात्याचा फक्त एक सामना शिल्लक आहे आणि शेवटचा सामना जिंकल्यानंतरही केकेआरला फक्त 14 गुण मिळू शकतील.
आतापर्यंत, आयपीएल पॉइंट टेबलमधील सर्व टॉप 4 संघांनी 14 किंवा त्याहून अधिक गुण मिळवले आहेत. याचा अर्थ असा की शनिवारी झालेल्या सामन्यात पराभव झाल्याने कोलकाता प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडू शकते. बंगळुरूला एक गुण मिळेल आणि तो 17 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहील.
हे ही वाचा -