IPL 2023 : आगामी इंडियन प्रिमीयर लीगच्या आधीच मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) एक वाईट बातमी समोर आली आहे. संघातील ऑस्ट्रेलियनवेगवान गोलंदाज झ्ये रिचर्डसनला पुन्हा दुखापत झाली असून आयपीएलपर्यंत तो दुखापतीतून बरा होण्याची शक्यता कमी आहे. डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या लिलावात रिचर्डसनला मुंबई फ्रँचायझीने 1.50 कोटींना विकत घेतले होते.


झ्ये रिचर्डसन हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीशी झुंज देत आहे. बिग बॅश लीग (बीबीएल) दरम्यान रिचर्डसनला ही दुखापत झाली होती. 4 जानेवारीपासून तो या दुखापतीमुळे मैदानाबाहेर होता. गेल्या शनिवारी तो परतला पण पुन्हा त्याला मैदान सोडावे लागले. दुखापतीमुळेसंपूर्ण दोन महिने मैदानाबाहेर राहिल्यानंतर रिचर्डसन गेल्या शनिवारी त्याच्या क्रिकेट क्लब फ्रेमंटलकडून खेळत होता. त्या ठिकाणीत्याला 50 षटकांच्या सामन्यात केवळ चार षटक टाकता आली. गोलंदाजी करताना त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि मग तो लगेचतपासणीसाठी पोहोचला. यानंतर, वैद्यकीय तपासणीत पुन्हा एकदा त्याची दुखापत समोर आली आणि त्याला काही आठवडे विश्रांतीचासल्ला देण्यात आला.


भारत दौऱ्यालाही मुकणार


झ्ये रिचर्डसन बिग बॅश लीगमध्ये पर्थ स्कॉचर्सचा भाग होता, परंतु हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो संघाच्या विजेतेपदाच्या संघाचा भागहोऊ शकला नाही. यानंतर तो ऑस्ट्रेलियाच्या मार्श कप आणि शेफिल्ड शील्डसारख्या देशांतर्गत स्पर्धांमध्येही खेळू शकला नाही. त्यानंतर त्याची प्रकृती बरी झाल्याने त्याची भारत दौऱ्यासाठी एकदिवसीय संघात निवड करण्यात आली होती, मात्र आता त्याच्याजागीऑस्ट्रेलियन संघात नॅथन एलिसला स्थान देण्यात आले आहे.


5 वर्षात केवळ 38 आंतरराष्ट्रीय सामने


रिचर्डसनने 2017 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, परंतु त्यानंतर 2019 मध्ये खांद्याच्या दुखापतीमुळे तो बराच काळऑस्ट्रेलियन संघाबाहेर होता. या 26 वर्षीय खेळाडूने आतापर्यंत तिन्ही फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी एकूण 36 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर एकूण 57 विकेट आहेत.


मुंबई इंडियन्सचं वेळापत्रक 
दोन एप्रिल  vs आरसीबी - अवे
आठ एप्रिल  vs चेन्नई - होम
11 एप्रिल  vs दिल्ली - अवे
16 एप्रिल vs कोलकाता - होम
18 एप्रिल vs हैदराबाद - अवे
22 एप्रिल vs पंजाब - होम
25 एप्रिल vs गुजरात - अवे
30 एप्रिल vs राजस्थान - होम
3 मे vs पंजाब - अवे
6 मे vs चेन्नई - अवे
9 मे vs आरसीबी - होम
12 मे vs गुजरात - होम
16 मे vs लखनौ - अवे
21 मे vs हैदराबाद - होम


हे देखील वाचा-