IPL 2023 Best Strike Rate Of Players : यंदा आयपीएलचा (IPL 2023) सोळावा हंगाम सुरु आहे. आयपीएल 2023 मध्ये दिग्गज खेळाडूंसह नवख्या खेळाडूंनीही मोठे विक्रम रचले आहेत. अनेक खेळाडूंनी मैदांनात धावांचा पाऊस पाडला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये फलंदाज अजिंक्य रहाणे दमदार फॉर्ममध्ये दिसून येत आहे. आयपीएल 2023 मध्ये अजिंक्य रहाणेचं रौदरुप पाहायला मिळत आहे. पावर प्लेमध्ये रहाणेचा स्ट्राईक रेट सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे याबाबतील 'हिट मशीन' विराट कोहली आणि 'हिटमॅन' रोहित शर्मा या दोघांनाही रहाणेनं मागे टाकलं आहे.


अजिंक्य रहाणेचे रौद्ररूप! पावर प्लेमध्ये सर्वात जास्त स्ट्राईक रेट


आयपीएल 2023 मध्ये सध्या पावर प्लेमधील सर्वात जास्त स्ट्राईक रेट अजिंक्य रहाणेचा आहे. रहाणेने पावर प्लेमध्ये 222.22 च्या स्ट्राईकरेटने धावा केल्या आहेत. यानंतर मीडल ओव्हर म्हणजे मधल्या षटकांमध्ये निकोलस पूरन हा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. मधल्या षटकांमध्ये निकोलस पूरनने सर्वाधिक 226.67 च्या स्ट्राईक रेटने धावा ठोकल्या आहेत. तसेच डेथ ओव्हर म्हणजे शेवटच्या 30 चेंडूमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम 20 वर्षीय तिलक वर्माच्या नावावर आहे. तिलक वर्माने शेवटच्या षटकांमध्ये 251.72 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.


डेथ ओव्हरमध्ये तिलक वर्माचा सर्वाधिक स्ट्राईक रेट






Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे


अजिंक्य रहाणे 2008 पासून आयपीएल खेळत आहे. रहाणेने आयपीएलच्या कारकिर्दीत 161 सामने खेळले असून त्यामध्ये 4203 धावा केल्या आहे. यामध्ये त्याने 443 चौकार आणि 86 षटकार ठोकले आहेत. इतकंच नाही तर आयपीएलमध्ये रहाणेनं 29 वेळा दमदार अर्धशतकी खेळी केली आहे. यंदाच्या आयपीएल मोसमातही रहाणे शानदार फॉर्ममध्ये आहे. फलंदाजीसह फिल्डींगमध्येही त्याची कमाल पाहायला मिळत आहे.


Tilak Verma : तिलक वर्मा


आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिलक वर्माचा समावेश आहे. आरसीबी विरुद्धच्या सामन्यात तुफान खेळी केली. 20 वर्षीय तिलक वर्माने 84 धावांची झंझावाती खेळी केली. मुंबईचे हार्ड हिटर फोल ठरल्यावर डावखुरा फलंदाज टिळक वर्मा याने एकहाती जबाबदारी स्वीकारली. त्याने 46 चेंडूत नऊ चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 84 धावा केल्या. वर्माने षटकार ठोकत 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. आयपीएल 2022 मध्ये तिलक वर्माच्या दमदार फलंदाजीने सर्वांनाच प्रभावीत केलं होतं. 


Nicholas Pooran : निकोलस पूरन


वेस्ट इंडिजचा फलंदाज निकोलस पूरन सध्या आयपीएल 2023 मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळत आहे. आरसीबीविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 19 चेंडूत 326.32 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना पुरनने 62 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळून संघाच्या विजयाचा हिरो ठरला. या खेळीत 4 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. आयपीएल 2023 मध्ये चमकणारा निकोलस पुरन जानेवारी 2015 मध्ये एका भीषण कार अपघाताचा बळी ठरला होता. या अपघातात पुरणचे दोन्ही पाय जवळपास निकामी झाले होते. अपघातानंतर पूरनने अनेक महिने व्हील चेअरवर घालवले. पण, काही काळानंतर पुरनने स्वत:ला अपघातातून सावरलं. त्यानंतर त्याने दमदार पुनरागमन केलं.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 Ishan Kishan : ईशान किशनची ऐतिहासिक कामगिरी, टी-20 मध्ये 4000 धावा पूर्ण, दिग्गजांच्या यादीत सहाव्या स्थानी