IPL 2024 : आयपीएल 2024 चा हंगाम 26 मे रोजी संपणार आहे. सध्या स्पर्धा ऐन रंगात पोहचली आहे. प्लेऑफचं चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. यंदाच्या हंगामातील अनेक खेळाडू पुढील हंगामात दिसणार नाही. यंदाच्या हंगामातील पाच दिग्गज पुढील हंगामात दिसणार नाही. आयपीएल 2024 नंतर पाच दिग्गज आयपीएलमधून निवृत्त होणार आहेत. यामध्ये अनेक दिग्गजांची नावे आहेत. पाहूयात 2024 आयपीएलनंतर कोण कोण निवृत्ती घेऊ शकतो.
दिनेश कार्तिक -
आरसीबीचा फिनिशर दिनेश कार्तिकनं आयपीएल 2024 आधीच निवृ्त्तीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे 38 वर्षीय दिनेश कार्तिक पुढील हंगामात खेळताना दिसणार नाही. कार्तिक सध्या क्रिकेट खेळण्यासोबत पार्टटाइम समालोचनाचं कामही करत आहे. तो यंदाच्या हंगामानंतर निवृत्त होणार आहे. यंदाचा हंगाम त्याचा अखेरचा असेल. त्यानं 253 सामने खेळले आहेत. तो आयपीएल 2008 पासून खेळत आहे. 17 हंगामानंतर तो थांबणार आहे.
उमेश यादव
36 वर्षयी उमेश यादव 2010 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. फिटनेस आणि फॉर्म पाहाता उमेश यादवचा यंदाचा अखेरचा हंगाम असू शकतो. उमेश यादव सध्या टीम इंडियाच्या बाहेरही आहे. यादव निवृत्ती घेत युवांना संधी देऊ शकते. आयपीएलमध्ये यादवने 147 सामन्यात 143 विकेट घेतल्या आहेत.
इशांत शर्मा
भारतासाठी 100 कसोटी सामने खेळणाऱ्या इशांत शर्मा पुढील हंगामात खेळण्याची शक्यता कमीच आहे. दुखापतीमुळे यंदाच्या हंगामात तो काही सामन्यांना मुकला आहे. वय, फिटनेस पाहा इशांत शर्माचा हा अखेरचा हंगाम असेल. इशांतने आतापर्यंत 107 सामन्यात 88 विकेट घेतल्या आहेत.
वृद्धिमान साहा
39 वर्षीय अनुभवी विकेटकीपर वृद्धिमान साहा याचाही यंदाचा हंगाम अखेरचा असू शकतो. 2024 आयपीएलनंतर साहा निवृत्तीची घोषमा करु शकतो. 2008 पासून साहा आयपीएल खेळत आहे. साहा यानं 170 सामन्यात 2934 धावा केल्या आहेत.
एमएस धोनी
चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार एमएस धोनी आयपीएल 2024 नंतर निवृत्ती घेऊ शकतो. मागील दोन वर्षांपासून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरु आहे. धोनी दुखापतीवर मात करत आयपीएल खेळत आहे. पण यंदाच्या हंगामानंतर धोनी थांबण्याची शक्यता आहे. धोनीने 261 सामन्यात 5191 धावा केल्या आहेत. धोनीच्या नावावर पाच आयपीएल चषकाची नोंद आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून धोनीची नोंद आहे.