IPL Mega Auction 2022: आयपीएल 2022 चं काउंटडाऊन सुरू झालंय. आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या हंगामात लखनौ आणि अहमदाबाद या दोन नव्या संघाचा समावेश झालाय. या हंगामात यावर्षी 8 ऐवजी 10 संघ खेळणार आहेत. यामुळं यंदाचा हंगाम प्रेक्षकांसाठी मनोरंजक ठरणार आहे. महत्वाचं म्हणजे, आयपीएल 2022 खेळाडूंच्या लिलावाचा भाग होण्यासाठी एकूण 1,214 खेळाडूंनी साइन अप केलंय. यात 896 भारतीय आणि 318 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. आयपीएल खेळाडूंची नोंदणी 20 जानेवारी 2022 रोजी बंद झाली.
येत्या 12 आणि 13 फेब्रुवारीला आयपीएलचं मेगा ऑक्शन होणार आहे. आयपीएलच्या या हंगामात लखनौ आणि अहमदाबाद या दोन नवे संघाचा समावेश झाल्यानं हे मेगा ऑक्शन असणार आहे. दरम्यान, 1214 खेळाडूंमध्ये 270 खेळाडूंनी राष्ट्रीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय आणि 103 खेळाडू अनकॅप आहेत. तर, 41 खेळाडू कॅप खेळाडू आहेत.
ट्वीट-
कोणत्या देशातील किती खेळाडूंनी नोंदवलं नावऑस्ट्रेलिया (59), दक्षिण आफ्रिका (48), वेस्ट इंडीज (41), श्रीलंका (36), इंग्लंड (30), न्यूझीलंड (29), अफगाणिस्तान (20), नेपाळ (15), अमेरिका (15), बांगलादेश (09), नामिबिया (05), आयर्लंड (03), ओमान (03), झिम्बाब्वे (02), भुटान (01), नेदरलँड्स (01), स्कॉटलँड (01) आणि यूएई (01).
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा संघआयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा संघ लखनौ ठरला आहे. संजीव गोएंका ग्रुपने तब्बल 7 हजार 90 कोटींना संघ विकत घेतला. आयपीएलच्या इतिहासातील एक यशस्वी कर्णधार असणारा गौतम गंभीर मेंटॉर अर्थात मार्गदर्शक म्हणून संघासोबत जोडला गेला आहे. तसेच झिम्बाब्वेचा माजी कर्णधार अँडी फ्लॉवरची (Andy Flower) लखनौचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- हे देखील वाचा-
- IPL 2022 : दहा संघानं कोणते खेळाडू केले खरेदी; कुणाकडे राहिली किती रक्कम? वाचा सविस्तर
- IPL 2022 Player Retention: अहमदाबादने खरेदी केले तीन खेळाडू, हार्दिक पांड्या कर्णधार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha