बंगळुरु: रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहली यंदाच्या आयपीएलमधला ऑरेन्ज कॅपचा मानकरी ठरला. कोहली यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा ठोकणारा फलंदाज ठरला.

 

यंदाच्या मोसमात 16 सामन्यांमध्ये 81.08च्या सरासरीनं 973 धावांचा रतीब घातला. आयपीएलच्या एकाच मोसमात एक हजार धावा करण्याची कोहलीची संधी हुकली. पण यंदा कोहलीनं एकूण चार शतकं आणि सात अर्धशतकं साजरी केली. तसंच 83 चौकार आणि 38 षटकारांचीही बरसात केली.

 

भुवीनं पटकावली पर्पल कॅप

 

भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं आयपीएलच्या नवव्या मोसमात सर्वाधिक विकेट्स काढणाऱ्या गोलंदाजासाठीची पर्पल कॅप मिळवली. भुवनेश्वरनं यंदाच्या मोसमात 17 सामन्यांमध्ये 7.42च्या इकॉनॉमी रेटसह 23 विकेट्स काढल्या आणि सनरायझर्स हैदराबादच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.