बंगळुरु : रायझिंग पुणेविरुद्धच्या शतकी खेळीबरोबरच विराट कोहलीनं आयपीएलच्या रेकॉर्डबुकमध्येही नाव नोंदवलं आहे. आयपीएलच्या एकाच मोसमात दोन शतकं ठोकण्याची कामगिरी विराटच्या नावावर जमा झाली आहे.

 
विराटने यंदा गुजरात लायन्सविरुद्ध नाबाद शंभर धावा फटकावून ट्वेन्टी 20 फॉरमॅटमधलं आपलं पहिलं शतक साजरं केलं होतं. आता पुण्याविरुद्ध नाबाद 108 धावांच्या खेळीसह आयपीएलच्या एकाच मोसमात दोन शतकं ठोकण्याची कामगिरी विराटने बजावली आहे.

 
विशेष म्हणजे पुण्याविरुद्धच्या लढतीत कोहली अवघ्या चार धावांवर धावचीत होता होता वाचला होता. विराटला बाद करण्याची संधी गमावल्यावर जॉर्ज बेलीलाही रूखरूख लागलेली दिसली. विराटनं मात्र त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवला.