IPL 2022 Points Table 2022 : आयपीएल स्पर्धा आता उत्तरार्धाकडे चालली आहे. स्पर्धा जसजसी उत्तरार्धाकडे चाललीय तसा स्पर्धेतील रोमांच वाढत चालला आहे. गुजरात संघानं गुणतालिकेत अव्वल राहत प्ले ऑफमधील प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. मात्र गुजरातसह टॉप 4 मध्ये कोण असणार याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.  

आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये गुजरातचा संघ टॉपवर असून लखनौ दुसऱ्या स्थानावर आहे.  पॉइंट्स टेबलमध्ये गुजरात 9 पैकी 8 सामने जिंकत 16 गुणांसह टॉपवर आहे. तर लखनौचा संघ 10 पैकी 7 सामने जिंकत 14 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. राजस्थान 9 पैकी सहा सामने जिंकत 12 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे तर हैदराबाद 10 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. बंगळुरुचे देखील दहा गुण आहेत मात्र नेट रनरेटच्या आधारे ते पाचव्या नंबरवर आहेत.  दिल्ली आणि पंजाबचे प्रत्येकी आठ गुण आहेत. मात्र दिल्ली नेट रनरेटच्या आधारे सहाव्या तर पंजाब सातव्या स्थानी आहे. कोलकाता 6 गुणांसह आठव्या तर  चेन्नई सहा गुणांसह नवव्या नंबरवर आहे तर मुंबईला 9 सामन्यांमध्ये केवळ एक सामना जिंकता आला आहे. 2 गुणांसह मुंबई तळाला आहे.   

आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत 46 सामने खेळले गेले आहेत. राजस्थानच्या खेळाडूंकडे ऑरेंज आणि पर्पल कॅपचा कब्जा आहे. जोस बटलरनं 9 सामन्यात 566 धावा करत ऑरेंज कॅप राखली आहे तर युजवेंद्र चहलनं 19 विकेट्स घेत  पर्पल कॅपवर कब्जा मिळवला आहे. सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत केएल राहुल दुसऱ्या स्थानी आहे. 10 सामन्यात त्याने 451 धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या पाच खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्यासह अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा हे नवखे आणि युवा खेळाडू देखील आहेत. 

IPL 2022 प्वाईंट्स टेबल:

नंबर टीम सामने विजय पराभव पॉईंट्स
1 GT 9 8 1 16
2 LSG 10 7 3 14
3 RR 9 6 3 12
4 SRH 9 5 4 10
5 RCB 10 5 5 10
6 DC 9 4 5 8
7 PBKS 9    4 5 8
8 KKR 9 3 6 6
9 CSK 9 3 6 6
10 MI 9 1 8 2
सर्वाधिक धावा जोस बटलरच्या

नंबर फलंदाज सामने धावा
1 जोस बटलर 9 566
2 के एल राहुल 10 451
3 अभिषेक शर्मा 7 324
4 हार्दिक पांड्या 8 308
5 तिलक वर्मा 9 307

 

पर्पल कॅपवर युजवेंद्र चहलचा कब्जा

नंबर गोलंदाज सामने विकेट
1 युजवेंद्र चहल 9 19
2 कुलदीप यादव 9 17
3 नटराजन 9 17
4 हसरंगा 10 15
5 उमरान मलिक 10 15