मुंबई : मुंबई इंडियन्सच्या लसिथ मलिंगाच्या नो बॉलकडे दुर्लक्ष करुन रॉयल चॅलेन्जर बंगलोरच्या विजयाची संधी हिरावून घेणारे पंच सुंदरम रवी आणि नंदन यांना त्यांच्या त्या चुकीची शिक्षा मिळण्याची शक्यता नाही. याचं कारण आयपीएलच्या 56 सामन्यांसाठी मिळून मोजक्या 11 भारतीय पंचांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ऑन फिल्ड आणि टेलिव्हिजन पंचांच्या भूमिकेत हेच 11 जण आलटून पालटून दिसणार आहेत. त्यात विशेष म्हणजे आयसीसीच्या एलिट पॅनेलमधले रवी हे एकमेव भारतीय पंच आहेत. याचा अर्थ रवी यांच्या तुलनेत अन्य भारतीय पंच अनुभवाने आणि दर्जाने कमी आहेत. या परिस्थितीत सामनाधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या दंड गुणांखेरीज रवी यांना त्यांच्या चुकीसाठी शिक्षा मिळणार नाही.
IPL नो-बॉल वाद : विराट कोहली अंपायरवर भडकला, रोहितही नाराज
काय होता वाद?
आयपीएलमधील बंगलोर आणि मुंबई संघामधल्या 28 मार्चच्या सामन्याला अखेरच्या क्षणी वादाचं गालबोट लागलं. बंगलोरला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी 7 धावा हव्या असताना लसिथ मलिंगाने टाकलेल्या चेंडूवर शिवम दुबेने एकेरी धाव घेतली आणि मुंबईच्या खेळाडूंनी विजयाचा जल्लोष सुरु केला. पण टीव्ही रिप्लेमध्ये हा शेवटचा चेंडू नो बॉल असल्याचं निदर्शनास आलं. मात्र ऑन फील्ड अंपायर एस रवी यांनी त्यावेळी नो बॉल घोषित न केल्याने हा सामना मुंबईने सहा धावांनी जिंकला.
सामना संपल्यानंतर बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने मात्र पंचांच्या या चुकीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली. "ही चुकीची बाब आहे. आपण आयपीएलमध्ये खेळतोय, क्लब क्रिकेटचा सामना नाही. पंचांना डोळे उघडे ठेवायला हवे होते. अखेरच्या चेंडूवर अशाप्रकारचा निर्णय ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. अटीतटीच्या सामन्यात अशाप्रकारचे निर्णय दिले तर काय होईल, हे माहित नाही. पंचांना अधिक सजग राहायला हवं, असं कोहली म्हणाला.
तर दुसरीकडे पंचांच्या निर्णयावर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मानेही नाराजी व्यक्त केली. रोहित म्हणाला की, "मैदानाबाहेर गेल्यानंतर कोणीतरी सांगितलं की तो नो बॉल होता. क्रिकेटसाठी अशाप्रकारचे निर्णय योग्य नाही. आधीच्या षटकांमध्ये पंचांनी बुमराचा एक चेंडू वाईड दिला, पण तो वाईड नव्हता. अटीतटीच्या सामन्यात अशाप्रकारचे निर्णय महागात पडू शकतात."
पंचांनी हा चेंडू नो बॉल घोषित केला असता तर बंगलोरला केवळ एक चेंडूच मिळाला नसता तर एक अतिरिक्त धाव आणि एक फ्री हिटही मिळाली असता. त्यामुळे सामन्याचा निकाल वेगळा आला असता.
IPL नो-बॉल वाद : पंच सुंदरम रवी, नंदन यांच्यावर कारवाईची शक्यता कमी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Mar 2019 10:09 AM (IST)
पंचांनी हा चेंडू नो बॉल घोषित केला असता तर बंगलोरला केवळ एक चेंडूच मिळाला नसता तर एक अतिरिक्त धाव आणि एक फ्री हिटही मिळाली असता. त्यामुळे सामन्याचा निकाल वेगळा आला असता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -