यंदाच्या मौसमापासून आयपीएल सामन्यांची वेळ बदलणार
एबीपी माझा वेब टीम | 30 Nov 2017 11:50 PM (IST)
याआधी आयपीएलच्या मागील दहा मोसमात दुपारी चार आणि रात्री आठ वाजता सामन्यांना सुरुवात होत होती. पण आता लवकरच यामध्ये बदल करण्यात येणार आहेत.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमध्ये लवकरच नवीन बदल आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आयपीएलचे यापुढच्या मोसमातील सामने हे दुपारी तीन आणि संध्याकाळी सात वाजता खेळवण्यात येतील. याआधी आयपीएलच्या मागील दहा मोसमात दुपारी चार आणि रात्री आठ वाजता सामन्यांना सुरुवात होत होती. पण आता लवकरच हे नवे बदल करण्यात येणार आहेत. यासंदर्भातला प्रस्ताव आयपीएल कमिशनर राजीव शुक्ला यांनी बीसीसीआय आणि आयपीएल प्रशासकीय समितीसमोर ठेवला आहे. आयपीएलच्या सर्व फ्रेंचायझींना हा निर्णय मान्य असून केवळ प्रसारणाचे हक्क असलेल्या स्टार इंडियाच्या संमतीची आवश्यकता असल्याचं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर स्पर्धेदरम्यान खेळाडूंच्या अदलाबदलीसंदर्भातही नवीन नियम लागू होण्याची शक्यता आहे.