लिलावात रबाडासाठी 1 कोटी रुपयांची बेस प्राईस होती. सेहवागने रबाडासाठी सातत्याने चढती बोली लावली. 1 कोटीवरुन ही बोली 2,3, 4 कोटींवर पोहोचली.
मात्र रबाडाला दिल्ली डेअरडेव्हिल्सने 5 कोटी रुपयांची बोली लावून, आपल्या संघात घेतलं.
दरम्यान, इंग्लंडच्या टायमल मिल्ससाठी सर्व संघ इच्छुक होते. अवघी 1 कोटी बेस प्राईस असलेल्या मिल्ससाठी तब्बल 12 कोटी रुपयांची बोली लावत विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने खरेदी केली.
दुसरीकडे न्यूझीलंडचा गोलंदाज ट्रेण्ट बोल्टला आपल्या संघात घेण्यासाठी मुंबई आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये चढाओढ सुरु होती.
गंभीरच्या कोलकाताने बोली जिंकत 1 कोटी बेस प्राईस असलेल्या बोल्टला 5 कोटी रुपयांत खरेदी केलं.
संबंधित बातम्या
बेन स्टोक्स पुण्याच्या ताफ्यात, बोली लावता लावता अंबानीही थकले!