जयपूर : इंडियन प्रीमियर लीग 2019 साठी जयपूर येथे खेळाडूंचा 18 डिसेंबरला लिलाव पार पडला. आयपीएलचे यंदाचे हे बारावे वर्ष आहे. एकेकाळचा आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू असलेला युवराजसिंग पहिल्या फेरीत अनसोल्ड ठरला होता. पण अखेरीस मुंबई इंडियन्सने त्याला एक कोटीच्या मूळ किंमतीत खरेदी करतं संघात घेतले. यंदाच्या लिलावाच्या पहिल्या फेरीमध्ये युवराजला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. दुसऱ्या फेरीमध्ये पुन्हा त्याचा लिलाव करण्यात आला. मुख्य म्हणजे ‘सिक्सर किंग’ युवराजसारख्या फलंदाजावर दुसऱ्या फेरीतसुद्धा केवळ मुंबईनेच बोली लावली. कारकीर्दीतील ऐन बहरात असताना युवराजवर 16 कोटी रुपयांची बोली लागली होती. युवराज काही वर्षे किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली डेअरडेविल्स या संघांमधून खेळला होता. गेल्या वर्षी किंग्ज इलेव्हन पंजाबने युवराजला दोन कोटी रुपये या मूळ किमतीलाच घेतले होते. परंतु युवराजला गेल्या मोसमात आठ डावांमध्ये एकूण 65 धावाच करता आल्याने पंजाब संघाने त्याला संघात स्थान न देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर आगामी विश्वचषकात युवराजला संधी मिळणार नसल्याचेही जवळपास स्पष्ट झाले आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपासून युवराज एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पहिल्या फेरीत कोणीही विकत न घेतलेल्या युवराजला दुसऱ्या फेरीत मुंबईने विश्वास दाखवत संघात स्थान दिले आहे. त्यामुळे आता युवराजसमोर चांगली कामगिरी करुन दाखवण्याचे आव्हान असणार आहे. आयपीएलमधील युवराजची कामगिरी
  • सामने : 128
  • धावा : 2652
  • अर्धशतकं : 12
  • सर्वाधिक धावा : 83
आयपीएलच्या 12 व्या सीझनच्या लिलावात एकूण 350 खेळाडूंचा समावेश असून त्यात 228 भारतीय आणि 133 परदेशी आहेत. जयपूरमध्ये आज या खेळाडूंवर आयपीएलच्या 8 फ्रॅन्चायजींनी बोली लावली. जयदेव उनाडकट - राजस्थान रॉयल्स - 8 कोटी 40 लाख वरुण चक्रवर्ती - किंग्ज इलेव्हन पंजाब - 8 कोटी 40 लाख सॅम करेन - किंग्ज इलेव्हन पंजाब - 7 कोटी 20 लाख कॉलिन इन्ग्राम - दिल्ली कॅपिटल्स - 6 कोटी 40 लाख कोलकाता नाईट रायडर्स- कार्लोस ब्रॅथवेट - 5 कोटी अक्षर पटेल - दिल्ली कॅपिटल्स - 5 कोटी मोहित शर्मा - चेन्नई सुपरकिंग्ज - 5 कोटी शिवम दुबे - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - 5 कोटी प्रभसिमरन सिंह - किंग्ज इलेव्हन पंजाब - 4 कोटी 80 लाख मोहम्मद शमी - किंग्ज इलेव्हन पंजाब - 4 कोटी 80 लाख हेटमायर - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - 4 कोटी 20 लाख वरुण अॅरॉन : राजस्थान रॉयल्स : 2 कोटी 40 लाख जॉनी बेयरस्टो : सनरायझर्स हैदराबाद : 2 कोटी 20 लाख लसिथ मलिंगा : मुंबई इंडियन्स : 2 कोटी हनुमा विहारी : दिल्ली कॅपिटल्स :  2 कोटी रुपये रिद्धिमान सहा - हैदराबाद सनरायझर्स - 1 कोटी 20 लाख इशांत शर्मा : दिल्ली कॅपिटल्स : 1 कोटी 10 लाख युवराज सिंह : मुंबई इंडियन्स : 1 कोटी मार्टिन गप्टिल - हैदराबाद सनरायझर्स - 1 कोटी सर्फराज खान - किंग्ज इलेव्हन पंजाब - 25 लाख या खेळाडूंना कोणत्याही संघाने खरेदी केले नाही शॉन मार्श हाशिम अमला अँजेलो मॅथ्यूज कोरी अँडरसन परवेझ रसूल जेसन होल्डर डेन स्टेल मॉर्ने मॉर्कल ब्रॅन्डन मॅक्यूलम ख्रिस वोक्स ख्रिस जॉर्डन चेतेश्वर पुजारा नमन ओझा संबंधित बातम्या IPL Auction 2019 : वरुण चक्रवर्तीची 8.4 कोटी रुपयांमध्ये विक्री IPL Auction 2019 : कोण टॉप, कोण फ्लॉप