IPL 2021 : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात कोलकाताने पंजाबवर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. पंजाबने कोलकातासमोर 123 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान कोलकाताने 16.4 षटकात 4 विकेट गमावून पूर्ण केले.
कोलकाताकडून कर्णधार ईऑन मॉर्गन सर्वाधिक (47) धावा केल्या. 123 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ईऑन मॉर्गन आणि राहुल त्रिपाठीने संघाला सावरले. राहुल त्रिपाठीने 32 बॉलमध्ये 41 धावा केल्या.
त्याआधी कोलकाताचा कर्णधार इयॉन मॉर्गनने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबच्या डावाची सुरुवात संथ झाली. कर्णधार केएल राहुल अवघ्या 19 धावा करत माघारी परतला. पंजाबची धावसंख्या पावरप्लेमध्ये 37 धावांवर एक बाद अशी होती. राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या ख्रिस गेलला खातंही उघडता आलं नाही. शिवम मावीने त्याला शुन्यावर बाद केलं. त्यानंतर आलेल्या दीपक हुडा देखील एक धाव करुन बाद झाला.
मयंक अगरवालने निकोलस पुरनच्या साथीने पंजाबचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र 11 व्या षटकात सुनील नारायणने मयंक अगरवालला बाद केलं. मयंकने 34 चेंडत 31 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या मोझेस हेन्रिक्सही दोन धावा करुन बाद झाला. हेन्रिक्स बाद झाल्यानंतर निकोलस पुरनही 19 धावा करुन बाद झाला. त्यानंतर शाहरुख खान 14 चेंडूत 13 धावा करुन बाद झाला. पंजाब 100 धावांचा टप्पा पार करेल की नाही हे वाटत असताना ख्रिस जॉर्डनने 18 चेंडूत 30 धावा केल्या आणि पंजाबने 123 धावसंख्या गाठली. कोलकाताकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. पॅट कमिन्स, सुनील नारायणे प्रत्येकी दोन तर शिवम मावीने एक विकेट घेतली.
पंजाबचा संघ : केएल राहुल (कर्णधाव आणि विकेटकीपर), मयंक अग्रवाल, क्रिस गेल, निकोलस पूरन, दीपक हुड्डा, मोइजेज हेनरिक्स, शाहरुख खान, क्रिस जॉर्डन, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद शमी.
कोलकाताचा संघ : शुभमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, इयोन मोर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आंद्रे रसेल, सुनील नरेन, पेंट कमिंस, वरुण चक्रवर्ती, शिवम मावी आणि प्रसिद्ध कृष्णा.