IPL 2021 : आयपीएल 2021 च्या स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बंगळूरु विरुद्ध पंजाब भिडणार आहेत. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. पंजाबने या हंगामात खेळलेल्या 6 सामन्यांपैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तर बंगळूरूने आतापर्यंत खेळलेल्या ६ पैकी ५ सामन्यात विजय मिळवला आहे.
बंगळूरुने दिल्लीला एका धावेने निसटता विजय मिळवला होता त्यानंतर त्यांचे १० गुण झाले होते. तर दुसरीकडे आयपीएलच्या या हंगामात पंजाबची कामगिरी निराशाजनक आहे.आतापर्यंत संघाच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केलेली आहे. परंतु, फलंदाज मात्र फारशी चांगली खेळी करु शकलेले नाहीत. दरम्यान, गेल्या सामन्यात कर्णधार केएल राहुलने तरुण लेग स्पिनर रवि बिश्नोईला प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी केलं होतं. बिश्नोईनं चार ओव्हर्समध्ये केवळ 21 धावा देत दोन विकेट्स घेतले. दरम्यान, संघासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, मयंक अग्रवाल आणि क्रिस गेल आपल्या फॉर्मात परतले आहेत. त्याचसोबत कर्णधार केएल राहुल या टुर्नामेंटमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
पंजाब आणि बंगळूरू आतापर्यंत 26 वेळा ऐकमेकांसमोर आले आहे. त्यातील 14 सामने पंजाबने जिंकले तर बंगळूरूने 12 सामने जिंकले आहे.
संभाव्य संघ
बंगळूरू- देवदत्त पडिकल, विराट कोहली (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिविलियर्स, डॅनियल सैम्स, वॉशिंगटन सुंदर, काइल जैमीसन, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज और हर्षल पटेल.
पंजाब - केएल राहुल, मयंक अग्रवाल, क्रिस गेल, डेविड मलान/निकोलस पूरन, दीपक हुड्डा, शाहरुख खान, मोइजेज हेनरिक्स, क्रिस जॉर्डन, रवि बिश्नोई, मोहम्मद शमी और अर्शदीप सिंह.