Punjab vs Delhi: आयपीएल 2021 मधील 29 वा सामना आज पंजाब आणि दिल्ली यांच्यात खेळला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सायंकाळी साडेसात वाजता सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघांनी मागील सामन्यात विजय मिळवला होता. आता दोन्ही संघांमध्ये विजयासाठी अटीतटीची सामना पाहायला मिळणार आहे.
तर दुसरीकडे आयपीएलच्या या हंगामात पंजाबची कामगिरी निराशाजनक आहे.आतापर्यंत संघाच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केलेली आहे. परंतु, फलंदाज मात्र फारशी चांगली खेळी करु शकलेले नाहीत. दरम्यान, गेल्या सामन्यात कर्णधार केएल राहुलने तरुण लेग स्पिनर रवि बिश्नोईला प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी केलं होतं.
दिल्लीने आतापर्यंत सात मॅचपैकी पाच मॅच जिंकले आहे. पॉईंट टेबलमध्ये दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पंजाबने आतापर्यंत सात सामन्यांपैकी तीनच सामन्यात विजय मिळवला आहे. केएल राहुलची टीम पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे.
दोन्ही संघ आजच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी मैदानावर उतरणार आहेत. त्यामुळे आजचा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. परंतु दिल्लीचं पारडं जड आहे. गेल्या सामन्यात जरी पंजाबने बंगळूरुचा पराभव केला असला तरी दिल्लीला हरवणे जड जाणार आहे.
दिल्ली - पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीव स्मिथ, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), शिमरन हेटमायर, मार्कस स्टोइनिस, ललित यादव, अक्षर पटेल, इशांत शर्मा, कगीसो रबाडा आणि आवेश खान.
पंजाब - केएल राहुल, प्रभसिमरन सिंह, क्रिस गेल, डेविड मलान, दीपक हु्ड्डा, शाहरुख खान, हरप्रीत बरार, क्रिस जॉर्डन, रीले मेरीडिथ/झाय रिचर्डसन, रवि बिश्नोई और मोहम्मद शमी.