Rajasthan vs Chennai: इंडियन प्रीमियर लीग सीझन 14च्या आज खेळवण्यात येणार  सामन्यात राजस्थान रॉयल्सची टक्कर  धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जसोबत होणार आहे.  हा सामना अबूदाबी येथे  खेळवण्यात येणार आहे. प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी चेन्नईने दुसऱ्या हाफमध्ये चार सामने खेळले आणि सर्व सामन्यात त्यांना यश मिळाले आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा प्रयत्न प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्याचा असेल


महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वात खेळणारा चेन्नई संघ या सीझनमध्ये चांगलाच फॉर्मात आहे. चेन्नआने 11 सामन्यांत 18 पॉईंट्स मिळवले आहेत. पॉईंट टेबलमध्ये सध्या चेन्नई पहिल्या क्रमांकावर आहे. तर राजस्थान रॉयल्सने 11 सामन्यांत 8 पॉईंट्स मिळवले आहेत. पॉईंट टेबलमध्ये सध्या राजस्थान सातव्या क्रमांकावर आहे. राजस्थानसाठी आज करो या मरो अशी परिस्थिती आहे. आजच्या सामन्यात राजस्थानाचा पराभव झाला तर नॉकआऊट प्रवेशात जाण्याची  शक्यता देखील संपेल. 


लागोपाठ चार मॅच जिंकल्यानंतर चेन्नई विजयाच्या शिखरावर आहे. चेन्नईने मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव केला. त्यानंतर आरसीबीचा सहा विकेटने आणि कोलकाताचा दोन विकेटने पराभव केला आहे. त्यानंतर हैदराबादच विरुद्धच्या सामन्यात सहा गडी राखत सामना जिंकला  होता. तर दुसरीकडे राजस्थानची या हंगामातील कामगिरी काही चांगली नाही. राजस्थानने दिल्लीचा 33 धावांनी आणि हैदराबादचा आणि आरसबीचा सात विकेटने पराभव केला होता. 


राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल हे दोन फलंदाज सोडले तर इतर फलंदाजांना विशेष कामगिरी करता आलेली नाही. हरफनमोला, क्रिस मॉरिस, रियान पराग आणि राहुल तेवतिया यांनी देखील विशेष कामगिरी केलेली नाही. दुसरीकडे गोलंदाजांमध्ये कार्तिक त्यागी, चेतन सकारिया आणि मुस्ताफिजूर रहमान यांनी चांगली कामगिरी केली आहे. हंगामातील सर्वात महागडा खेळाडू मॉरिसने मात्र निराशा केली आहे. 


दोन्ही संघांचे संभाव्य संघ :


CSK Playing 11 : फाफ डू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), सैम कर्रन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर आणि जोश हेजलवुड. 


RR Playing 11: संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), एविन लुईस, यशस्वी जायसवाल, लियाम लिविंगस्टोन/डेविड मिलर, महिपाल लोमरोर, रियान पराग/शिवम दुबे, राहुल तेवतिया, क्रिस मॉरिस, मुस्तफिजूर रहमान, चेतन सकारिया, जयदेव उनादकट.