IPL 2020 : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीने इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या पराभवासाठी फलंदाजांना दोषी ठरवले आहे. तो म्हणाला की, त्याची टीम फलंदाजी करताना धैर्य दाखवत नाही. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला सात विकेटवर 120 धावांत रोखल्यानंतर साहा (39) आणि मनीष पांडे (26) यांच्या दुसऱ्या विकेटसाठी 50 धावांच्या भागीदारीमुळे हैदराबादने 14.1 षटकांत पाच बाद 121 धावा करत विजय मिळवला. शेवटी जेसन होल्डरनेही 10 चेंडूत तीन षटकार आणि चार धावांच्या मदतीने 26 धावांची नाबाद खेळी करत संघाला लक्ष्य गाठून दिले.


अंतिम सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणे आवश्यक
बँगलोरकडून सलामीवीर जोश फिलिप (32) वगळता कोणत्याही फलंदाजाने 30 धावांचा टप्पा ओलांडला नाही. कोहली म्हणाला, "या धावा पुरेशा नव्हत्या. आम्हाला वाटलं की संघाची धावसंख्या 140 पर्यंत जाईल. मात्र, परिस्थिती अचनाक बदलली. वातावरणात बदल झाल्याने मैदानानर दव पडले.


IPL 2020 : धडाकेबाज केएल राहुल! विराट, गेल, वॉर्नरच्या पंक्तीत, केला नवा विक्रम


"मला वाटते संपूर्ण डावादरम्यान फलंदाजीनी धैर्याने प्रदर्शन केले नाही. विरोधी गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत खेळपट्टीचा चांगला उपयोग केला. आता शेवटचा सामना जिंकणे आवश्यक झाले आहे. पॉईंट टेबलमध्ये पहिल्या दोनमध्ये जाण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे. बँगलोरचा मुकाबला आता दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. सध्या दोन्ही संघाचे 14 गुण आहेत.


वॉर्नरकडून विजयाचे श्रेय गोलंदाजांना
दुसरीकडे सनरायझर्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने गोलंदाजांना या विजयाचे श्रेय दिले. वॉर्नर म्हणाला, "जेव्हा आम्ही येथे आलो तेव्हा आम्हाला हे माहित होते की पात्रतेसाठी आम्हाला वरच्या संघांना पराभूत करावे लागणार आहे. त्याच इराद्याने मैदानार उतरून हा सामना आम्ही जिंकला.


वार्नर म्हणाला, “आज सर्व श्रेय गोलंदाजांना जाते. विकेट मंदावल्याने गोलंदाजांना आपली रनणीती बदलावी लागली. केवळ यॉर्कर्स किंवा स्लो बॉलने भागणार नव्हते. तर विकेटवर गोलंदाजी करावी लागणार होती. दव पडल्याचं मला आश्चर्य वाटलं नाही. इथं हवामान थंड असल्याने दव पडणे साहजिक आहे.


वॉर्नरने गोलंदाजी आणि फलंदाजीत दुतर्फा उत्कृष्ट कामगिरीबद्दल होल्डरचे कौतुक केले. तो म्हणाला, "जेसन हा एक चांगला क्रिकेटपटू आहे." त्याच्या उंचीमुळे, त्याला बाउन्सर चेंडू टाकण्यासाठी शॉर्ट बॉलिंग करावी लागेल. अशा खेळपट्ट्यांवर अशा चेंडूंवर फटके मारणे सोपे असते. पुढील सामना आमच्यासाठी करो या मरो असा आहे. आम्ही अद्याप आयपीएल जिंकू शकतो. 2016 मध्येही आम्हाला शेवटचे तिन्ही सामने जिंकावे लागले होते.