IPL 2020 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नईचा काल 37 धावांनी पराभव केला. मॅन ऑफ द मॅच ठरला तो विराट कोहली. चेन्नईविरूद्धच्या सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कॅप्टन कोहलीने तुफान फटकेबाजी करत संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली. कोहलीने दमदार खेळ करत आपल्या IPL कारकिर्दीतील 38 वे अर्धशतक ठोकले. या अर्धशतकाच्या बळावर कोहलीने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि चेन्नईचा फलंदाज सुरेश रैना या दोघांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
IPL मध्ये सर्वाधिक अर्धशतकं हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहेत. त्याने 132 सामन्यांमध्ये 46 अर्धशतके ठोकली आहेत. या यादीत विराट आता सुरेश रैना, रोहित शर्मासह दुसऱ्या स्थानावर आला आहे. सुरेश रैनाने 193 सामन्यांमध्ये 38 अर्धशतके ठोकली आहेत. रोहित शर्माच्या नावावर 194 सामन्यात तर विराटने 183 सामन्यात 38 अर्धशतकं ठोकली आहेत.
CSK vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा 37 धावांनी विजय; चेन्नईचा 5 वा पराभव, विराट कोहली ठरला हिरो
कालच्या सामन्यात चेन्नईविरुद्ध शारजाच्या मैदानात विराटने चौफेर फटकेबाजी केली. बंगळुरूने दिलेलं 170 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईला 132 धावांपर्यंतचं मजल मारता आली. चेन्नई संघाची सुरुवात अडखळत झाली. चेन्नईने 20 षटकांमध्ये आठ गडी गमावत 132 धावांपर्यंत मजल मारली. बंगळुरुच्या बॉलर्सने आज टिच्चून गोलंदाजांनी केली. ख्रिस मॉरिसचं तर विशेष कौतुक करायला हवं. त्याने अवघ्या 19 धावा देत 3 गडी बाद केले. वॉशिंग्टन सुंदरनेही 2 माघारी धाडले तर ईसुरु उदाना आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी एक विकेट घेतली.
चेन्नईविरूद्धच्या सामन्यात कर्णधार विराट कोहली आज त्याच्या मुळ रुपात दिसला. विराटने आज कर्णधार पदाला साजेशी खेळी केल्याने बंगळुरूने 20 षटकात 4 बाद 169 धावा काढल्या. दरम्यान, बँगलोरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विराटने आज धमाकेदार नाबाद 90 धावांची खेळी केली.