RCB vs KXIP IPL 2020: आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना किंग्स इलेव्हन पंजाबशी होणार आहे. शारजात हा सामना सायंकाळी 7 वाजता रंगणार आहे. या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाबला चांगली कामगिरी करता आली नाही. आतापर्यंत पंजाबने खेळलेल्या 7 सामन्यांपैकी 1 सामना जिंकला असून 6 सामने पराभूत झाले आहे. तर सुरुवातीला बंगलोरची कामगिरी तितकी चांगली नव्हती, परंतु हळूहळू या संघाने लय मिळविली आणि आता संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले असून कर्णधार विराट कोहलीचा संघ पॉईंटस टेबलवर तिसऱ्या क्रमांकावर आहे.


पंजाबची कामगिरी जरी चांगली नसली तरी पंजाबकडे उत्कृष्ट फलंदाज आहे. पंजाबचा कर्णधार के एल राहुलने आतापर्यत आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा केल्या असून त्याच्याकडे ऑरेंज कॅप आहे. राहुलने 7 मॅचमध्ये 387 धावा केल्या आहेत तर मयंक अगरवालने 7 मॅचमध्ये 337 धावा केल्या आहेत. म्हणजे आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे दोन फलंदाज पंजाबच्या टीममध्ये आहे.


विराट कोहलीने आजच्या सामन्या 3 सिक्स मारले तर, विराटचे आयपीएलमधील 200 सिक्स पूर्ण होतील. या शिवाय जर विराटने मॅचमध्ये 6 फोर मारले तर आयपीएलमध्ये 500 फोर मारणारा फलंदाज ठरणार आहे. आयपीएलमध्ये सर्वात जास्त सिक्स मारण्याचे रेकॉर्ड युनिव्हर्सल बॉस क्रिस गेलच्या नावावर आहे. आयपीएलमध्ये मध्ये गेलने 326 सिक्स मारले आहेत. तर सर्वात जास्त फोर मारण्याचा रेकॉर्ड शिखर धवन (549) च्या नावावर आहे.


पंजाब संघाला या हंगामात चांगली कामगिरी करता आलेली नाही. पंजाबनं 7 पैकी केवळ 1 सामना जिंकला आहे, त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना हा सामना जिंकणे गरजेचे आहे. तर, आरसीबी 10 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी त्यांना 2 गुणांची गरज आहे.