IPL 2020 DC Vs RR: आयपीएलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. दिल्लीनं पाचपैकी चार सामने जिंकून यंदाच्या मोसमात दमदार सुरुवात केली आहे. हीच विजयी वाटचाल सुरु ठेवण्याचा दिल्लीचा प्रयत्न राहिल. दुसरीकडे राजस्थानला मात्र गेल्या तीन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. पण अष्टपैलू बेन स्टोक्सच्या संघात परतण्यानं राजस्थानची बाजू भक्कम झाली आहे.


पॉईंट टेबलवर अव्वल येण्याचा दिल्लीचा प्रयत्न


यंदाच्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी आतापर्यंत उत्तम असून पॉईंट टेबलवर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच मुंबई इंडियन्सही समान गुणांसह अव्वल स्थानी आहे, कारण त्याचा नेट रन दर दिल्लीपेक्षा जास्त आहे. जर दिल्लीने आजचा सामना जिंकला तर त्यांचे 10 गुण होतील आणि दिल्लीचा संघ पॉईंट टेबलच्या अव्वल स्थानी येईल.


शारजात राजस्थानची कामगिरी चांगली


आयपीएलच्या या मोसमात राजस्थान पॉईंट टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर जरी असले तरी शारजात त्यांची कामगिरी चांगली राहिली आहे. आतापर्यंत राजस्थानने दोन सामने जिंकले आहेत आणि दोन्ही सामने त्यांनी शारजात जिंकले आहेत. अशा परिस्थितीत राजस्थान रॉयल्स या मैदानावर आपला विक्रम कायम ठेवू शकेल काय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मागील तीन सामने राजस्थान संघाने गमावले आहेत.



दिल्ली कॅपिटल्स


शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर (कॅप्टन), ऋषभ पंत, शिमरन हेटमायर, मार्कस स्टोइनिस, आर अश्विन, अक्षर पटेल, इनरिच नॉर्टजे, हर्षल पटेल आणि कगिसो रबाडा


राजस्थान रॉयल्स


जोस बटलर, स्टीव स्मिथ (कॅप्टन), संजू सैमसन, राहुल तेवतिया, मनन वोहरा, महिपाल लोमरोर, अंकित राजपूत, श्रेयस गोपाल, जोफ्रा आर्चर, टॉम करन, अंकित त्यागी