CSK vs RR: इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या मोसमात आज चेन्नई सुपर किंग्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. दुबईतील शेख झायेद स्टेडियमवर हा सामना सायंकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. या हंगामात दुसऱ्यांदा हे दोन संघ आमनेसामने आले आहेत. यापूर्वी शारजात हे दोन संघ समोरासमोर आले होते. या दोघांमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात राजस्थानने चेन्नईचा पराभव केला होता. त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आज धोनीचा संघ मैदानात उतरेल.
पॉईंट टेबल्समध्ये चेन्नई तीन विजयासह सातव्या क्रमांकावर आहे. तर राजस्थान तीन विजयासह आठव्या क्रमांकावर आहे. आजच्या सामन्यात जिंकणारी टीम पाचव्या क्रमांकावर जाईल.
अबू धाबीमधील शेख झायेद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम शारजा क्रिकेट स्टेडियमच्या तुलनेत पूर्णपणे वेगळे आहे. शारजाचे मैदान लहान असून त्यापेक्षा शेख झायेद स्टेडियम आकाराने हे बर्यापैकी मोठे मैदान आहे. परंतु येथे फिरकी गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकते. अशा परिस्थितीत दोन्ही संघ दोन आघाडीच्या फिरकी गोलंदाजांसह मैदानावर येऊ शकतात.
संभाव्य टीम
चेन्नई सुपर किंग्स : सैम कर्रन, फाफ डू प्लेसिस, शेन वॉटसन, अंबाती रायडू, एमएस धोनी (कर्णधार), रविंद्र जडेजा, केदार जाधव, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, कर्ण शर्मा और जोश हेज़लवुड
राजस्थान रॉयल्स : रॉबिन उथप्पा, जोस बटलर, संजू सैमसन, स्टीव स्मिथ (कर्णधार), बेन स्टोक्स, रियान पराग, राहुल तेवतिया, श्रेयस गोपाल, जोफ्रा आर्चर, वरुण एरॉन और कार्तिक त्यागी