हैदराबाद : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्री क्रिकेट स्टेडियमवर आज आयपीएलच्या 12 व्या मोसमातील अंतिम सामना रंगणार आहे. आयपीएलच्या बाराव्या मोसमाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता प्रत्येक क्रिकेटरसिकाला लागून राहिली आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांमध्ये आज रात्री आयपीएलची अंतिम लढत रंगणार आहे.


गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक रोमांचक सामने चाहत्यांना पाहायला मिळाले आहे. प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवत मुंबई आणि चेन्नईच्या सांघांनी फायनलमध्ये धडक दिली आहे. आता आयपीएलचा चषक कोण उंचावणार याची सर्वांना उस्तुकता लागली आहे. या उस्तुकतेसोबत जिंकणाऱ्या संघाला चषकासोबत बक्षीस म्हणून किती रक्कम मिळणार? उपविजेत्याला काय मिळणार? हे प्रश्नदेखील अनेकांना पडले आहेत.

यंदाच्या आयपीएलमध्ये जो संघ विजेता होणार त्या संघाला तब्बल 20 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तर अंतिम सामन्यात हरणाऱ्या संघाला (उपविजेता) 12.5 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. त्यासोबत वेगवेगळ्या गटांमध्ये खेळाडूंनादेखील मोठी बक्षीसं दिली जाणार आहेत.

विजेता : 20 कोटी रुपये
उपविजेता (रनर-अप) : 12.5 कोटी रुपये
ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा करणारा खेळाडू) : 10 लाख रुपये
पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू) : 10 लाख रुपये
मोस्ट वॅल्यूबल प्लेयर ऑफ द ईयर : 10 लाख
इमर्जिंग प्लेयर ऑफ द सिजन : 10 लाख
गेम चेंजर ऑफ द सिजन : 10 लाख
परफेक्ट कॅच ऑफ द सिजन : 10 लाख
स्टाइलिश प्लेयर ऑफ द सिजन : 10 लाख
सुपर स्ट्राइकर ऑफ द सिजन : कार आणि चषक

वाचा :  आयपीएलच्या अंतिम फेरीत मुंबई-चेन्नई भिडतात, तेव्हा काय होतं?