चेन्नई : सर्फराज खान आणि लोकेश राहुलच्या शतकी भागिदारीनंतरही किंग्स इलेव्हन पंजाबला चेन्नईकडून 22 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह चेन्नईनं यंदाच्या मोसमातला चौथा विजय साजरा केला. चेन्नईनं पंजाबसमोर विजयासाठी 161 धावांचं आव्हान ठेवलं होतं.


पण चेन्नईच्या अचूक माऱ्यासमोर पंजाबला पाच बाद 130 धावांचीच मजल मारता आली. सर्फराज खाननं 67 तर लोकेश राहुलनं 55 धावांची खेळी केली. पण या पंजाबला विजय मिळवून देण्यात या दोघांचे प्रयत्न अपुरे पडले. चेन्नईच्या हरभजन सिंग आणि स्कॉट कुगलीननं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. त्याआधी फाफ ड्यू प्लेसीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नई 20 षटकांत तीन बाद 160 धावा उभारल्या.

यानंतर विजयासाठी आवश्यक असलेल्या 161 धावा पूर्ण करणं पंजाबला जमलं नाही. अखेरीस चेन्नईने 22 धावांनी विजय मिळवत स्पर्धेत दणक्यात पुनरागमन केलं. चेन्नईकडून हरभजन सिंह आणि स्कॉट कुगलेजीनने प्रत्येकी 2-2, तर दीपक चहरने 1 गडी बाद केला.

याआधी,पंजाबच्या गोलंदाजांनी टिच्चून केलेल्या माऱ्यामुळे पंजाबने चेन्नई सुपरकिंग्जला 160 धावांवर रोखण्यात यश मिळवलं. चेन्नई सुपरकिंग्जने घरच्या मैदानावर सामना खेळत असताना नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिस यांनी आश्वासक भागीदारी करुन दिली. मात्र रविचंद्रन आश्विनने शेन वॉटसनला माघारी धाडत चेन्नईला धक्का दिला होता.