IPL 2018 : मुंबईचा सलग दुसरा पराभव, हैदराबादचा एका विकेटने विजय
एबीपी माझा वेब टीम | 13 Apr 2018 08:56 AM (IST)
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं मुंबई इंडियन्सवर एक विकेट राखून विजय मिळवला.
मुंबई : शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं मुंबई इंडियन्सवर एक विकेट राखून विजय मिळवला. आयपीएलच्या अकराव्या मोसमात मुंबईला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात मुंबईनं हैदराबादला 20 षटकात 148 धावांचं आव्हान दिलं होतं. हैदराबादच्या प्रभावी गोलंदाजीमुळे मुंबईला 20 षटकात आठ बाद 147 धावांची मजल मारता आली होती.