जयपूर: कोलकाता नाईट रायडर्सनं राजस्थान रॉयल्सचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून, आयपीएलच्या मोसमातला तिसरा विजय साजरा केला.

जयपूरमधल्या सामन्यात कोलकात्याच्या गोलंदाजांनी राजस्थानला आठ बाद १६० धावांत रोखून निम्मी कामगिरी फत्ते केली.

कोलकात्याकडून नितीश राणा आणि टॉम करननं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर कोलकात्यानं सात चेंडू आणि सात विकेट्स राखून विजयासाठीचं लक्ष्य पार केलं.

कोलकात्याकडून सुनील नारायणनं ३५, रॉबिन उथाप्पानं ४८, नितीश राणानं नाबाद ३५ आणि दिनेश कार्तिकनं नाबाद ४२ धावांची खेळी उभारली.