मुंबई इंडियन्सने मला सर्व काही दिलं, त्यामुळे मी मुंबई इंडियन्स सोडण्याचा विचार का करु, असं हार्दिक पंड्या म्हणाला. न्यूज 18 शी बोलताना त्याने याबाबतची प्रतिक्रिया दिली.
युवराजचा सलग 6 षटकार मारण्याचा विक्रम मोडायचाय : हार्दिक पंड्या
पंड्या म्हणाला, “मुंबई इंडियन्स सोडणार असल्याच्या अफवा ऐकून मी खूपच नाराज झालो. या टीमने मला सर्वकाही दिलंय. त्यामुळे मी हा संघ का सोडू? जेव्हा मला मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची संधी मिळाली, तेव्हापासून माझं आयुष्यच बदललं आणि तेव्हापासून मी मागे वळून पाहिलंच नाही”
केवळ दहा लाखात खरेदी
बडोद्याच्या हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सने 2013 मध्ये केवळ दहा लाखात खरेदी केलं होतं. गेल्या तीन मोसमात पंड्याने स्वत:ची कामगिरी सुधारुन, मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
मात्र गेल्या काही दिवसांपासून पंड्या मुंबई इंडियन्सला सोडून आयपीएलच्या लिलावात सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली होती. आता त्यावर स्वत: पंड्याने स्पष्टीकरण देत चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
हार्दिक पांड्याच्या भावासाठी मुंबई इंडियन्सने मोजले 20 पट अधिक रुपये
भावाला दोन कोटी
रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने तीन वर्षात दोनवेळा विजेतपद पटकावलं. रोहितप्रमाणे जसप्रीत बुमरा आणि कृणाल पंड्या यांनी महत्त्वाची कामगिरी केली होती. महत्त्वाचं म्हणजे हार्दिक पंड्याला दहा लाखात घेणाऱ्या मुंबई इंडियन्सने त्याचा भाऊ कृणालसाठी तब्बल 2 कोटी रुपये मोजले होते.
आयपीएलच्या येत्या हंगामात सर्व खेळाडूंची नव्याने बोली लागणार आहे, केवळ तीन जुन्या खेळाडूंनाच संघात कायम ठेवता येईल.
संबंधित बातम्या
लिशा शर्माकडून हार्दिक पांड्या क्लीन बोल्ड?
सचिनची हार्दिक पंड्याबाबतची भविष्यवाणी खरी ठरली!
हार्दिक पांड्याच्या भावासाठी मुंबई इंडियन्सने मोजले 20 पट अधिक रुपये
बर्थ डे स्पेशल : फॉर्म न भरल्यामुळे पंड्याला कोचने दोन वर्ष खेळू दिलं नव्हतं
बर्थ डे स्पेशल : दोन सिक्स मारले की तिसरा मारतोच, पंड्या आणि विक्रम
हार्दिक पंड्या आणि परिणीती चोप्रा यांच्या अफेअरमागचं व्हायरल सत्य
गर्लफ्रेंडसोबत हार्दिक पंड्या हाँगकाँगमध्ये!