त्यानंतर श्रेयस अय्यर आणि अँजेलो मॅथ्यूज यांनी पाचव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी रचली, पण विजयासाठीचं लक्ष्य हैदराबादपासून 15 धावांनी दूरच राहिलं. हैदराबादचा हा सहा सामन्यांमधील चौथा विजय ठरला.त्याआधी, हैदराबादच्या डावात सलामीचा शिखर धवन आणि केन विल्यमसन यांनी कमालीची फलंदाजी केली. त्या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 86 चेंडूंत तब्बल 136 धावांची भागीदारी रचली. त्यात विल्यमसनचा वाटा होता 51 चेंडूंमधल्या 89 धावांचा. त्याच्या या खेळीला सहा चौकार आणि पाच षटकारांचा साज होता.
शिखर धवननं 50 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकारासह 70 धावांची खेळी केली. त्यामुळंच हैदराबादला 20 षटकांत चार बाद 191 धावांची मजल मारता आली. विशेष म्हणजे हैदराबादच्या चारही फलंदाजांना दिल्लीच्या ख्रिस मॉरिसनंच माघारी धाडलं.