मुंबई : व्हॉट्सअॅप हे पूर्णतः फोन नंबरवर आधारित अॅप असल्यामुळे नंबर बदलणं ही अनेकांसाठी डोकेदुखी ठरते. आपला बदललेला नंबर मित्रांना कळवण्यासाठी ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करुन नवा नंबर पोस्ट करावा लागतो. मात्र ही कटकट लवकरच दूर होण्याची चिन्हं आहेत.

व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये 'चेंज नंबर' हे फीचर अधिक सुटसुटीत करण्यासाठी टेस्टिंग सुरु आहे. नव्या अपडेटनुसार ग्रुपसोबतच पर्सनल चॅटमध्येही म्हणजेच तुमच्या व्हॉट्सअॅपवरील कॉन्टॅक्ट्सना वैयक्तिकरित्याही तुमच्या नव्या नंबरची नोटिफिकेशन पाठवता येणार आहे.

तुमच्या प्रत्येक कॉन्टॅक्टला बदललेला नंबर कळवायचा, की तुम्ही ज्याच्याशी चॅट करता, त्याच व्यक्तींना त्याची नोटिफिकेशन पाठवायची, हे निवडण्याचा पर्यायही उपलब्ध असेल. सोबतच लाईव्ह लोकेशन आणि 'रिव्होक' ही फीचर्स आणण्याचीही तयारी सुरु आहे.

बीटा व्हर्जनमधील टेस्टिंगनंतर हे फीचर प्रत्यक्ष अॅपमध्ये येणार का, येणार असल्यास कधी, याविषयी अधिक माहिती तूर्तास नाही.

https://twitter.com/WABetaInfo/status/853230467193196544

संबंधित बातम्या :


सावधान! तुम्हालाही कोणी व्हॉट्सअॅप व्हेरिफिकेशन कोड मागितलाय का?


WhatsApp वेबवर रिव्होक फिचर, मेसेज UnSend करता येणार!


व्हॉट्सअॅप डेटा हॅक, ब्लॅकमेलिंग करणाऱ्या हॅकर्सचा धुमाकूळ