जोहान्सबर्ग : टीम इंडियाने जोहान्सबर्गच्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 28 धावांनी धुव्वा उडवला. भारताने या विजयासह तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं होतं.
या सामन्यादरम्यान एक घटना अशीही घडली, ज्यामुळे सर्व प्रेक्षक गोंधळून गेले. दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरु असताना 14 व्या षटकात कर्णधार विराट कोहलीला त्रास जाणवू लागला, ज्यामुळे तो मैदान सोडून ड्रेसिंग रुममध्ये परतला. मात्र सुदैवाने ही दुखापत गंभीर नसल्याची अपडेट आली आहे.
''खेळ सुरु झाला तेव्हाच ही जखम झाली होती. दुखापत गंभीर नव्हती. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून आराम करणं पसंत केलं,'' अशी माहिती विराटने सामन्यानंतर दिली.
दरम्यान, दुखापत गंभीर नसल्यामुळे विराट आता पूर्णपणे फिट आहे. 21 फेबुवारीला होणाऱ्या सामन्यातही तो भारतीय संघाच नेतृत्त्व करण्यासाठी सज्ज आहे.