हरारेः झिम्बाब्वेच्या तीन एकदिवसीय मालिकेच्या दौऱ्यावर गेलेली टीम इंडीया आज पहिला सामना खेळणार आहे. कर्णधार महेंद्र सिंह धोनी नव्या दमाच्या खेळांडूंसह आज मैदानात उतरणार आहे. संघात असे पाच खेळाडू आहेत, ज्यांचा पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.


 

धोनी 2005 नंतर पहिल्यांदाच झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे, त्यामुळे नवीन खेळाडू आणि मोठ्या कालावधीनंतरचा दौरा, यामुळे धोनीसमोर मोठं आव्हानं असणार आहे.

 

टीम इंडीयाची यंग ब्रिगेड

 

धोनी वगळता सध्याच्या संघामध्ये अंबाती रायडू आणि अक्षर पटेल हे दोनच असे खेळाडू आहेत, ज्यांच्याकडं आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. आयपीएलमध्ये जबरदस्त प्रदर्शन करणारा खेळाडू लोकेश राहुल याला पहिल्यांदाच एकदिवसीय सामन्यात संधी देण्यात आली आहे. तर यजुवेंद्र चाहल, करुण नायर आणि धवल कुलकर्णी यांनाही पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे.

 

संघाच्या गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह आणि धवल कुलकर्णी यांच्यावर असणार आहे. शिवाय धोनीकडे जयदेव उनादकांत हा देखील पर्याय आहे. तर फलंदाजीची धुरा लोकश राहुल, करुण नायर, मनीष पांडे, केदार जाधव या युवा खेळाडूंवर असणार आहे.

 

या सहा खेळाडूंना पहिल्यांदाच संधीः

  • लोकेश राहुल



  • फेझ फैझल



  • करुण नायर



  • जयंत यादव



  • यजुवेंद्र चाहल



  • मनदिप सिंह


 

भारतीय संघः

महेंद्र सिंह धोनी(कर्णधार), लोकेश राहुल, फेझ फैझल, मनीष पांडे, करुण नायर, अंबाती रायडू, ऋषी धवन, अक्षर पटेल, जयंत यादव, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, बरिंदर सरन, मदिप सिंह, केदार जाधव, जयदेव उनादकांत, यजुवेंद्र चाहल.

 

झिम्बाब्वे संघः

ग्रीम केमर(कर्णधार), रिचमोंड मुतुम्बामी, तौराई मुजुराबानी, चामुअनओरवा चिबाबा, पीटर जोसेफ मूर, एल्टन चिगम्बुरा, वुसिमुजी सिबांडा, तवांडा मुपारिवा, सीन विल्यम्स, सिकंदर रजा बेट, नेव्हिले माडजिवा, डोनाल्ड टिरिपानो, टिमयसेन मारुमा, वेलिंग्टन मासाकाड्झा, टेंडाई चिसोरो. हेमिल्टन मासाकाड्झा, टेंडाई चाटारा, क्रेग इरविन.

 

हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडे 12 वाजता सुरु होईल.