LIVE UPDATE : INDvsNZ 2nd ODI | न्यूझीलंडवर 90 धावांनी मात, टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
भारतीय संघात सलामीवीर शिखर धवन सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. सोबतच कर्णधार विराट कोहलीच्या कामगिरीकडेही लक्ष असेल. सोबतच रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव यांचा फॉर्मही चांगला असल्याने टीम इंडिया न्यूझीलंडसमोर मोठे आव्हान ठेवण्याची शक्यता आहे.
पार्श्वभूमी
माऊंट मॉन्गॅनुई : नेपियरच्या पहिल्या वन डेत न्यूझीलंडवर एकहाती विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीची टीम इंडिया दुसऱ्या विजयासाठी सज्ज झाली आहे. नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार विराट कोहली याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भारत आणि न्यूझीलंड संघांमधली दुसरी वन डे माऊंट मॉन्गॅनुई येथे खेळवण्यात येत आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना सुरू आहे. 5 सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना भारताने सहज जिंकल्यामुळे विजयी लय कायम राखण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानावर उतरला आहे. तर यजमान न्यूझीलंडचा सलामीच्याच सामन्यात पराभव झाल्यामुळे आजच्या सामन्यात हा संघ तयारीनिशी विजयासाठी मैदानात उभा ठाकला आहे.
भारतीय संघात सलामीवीर शिखर धवन सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. सोबतच कर्णधार विराट कोहलीच्या कामगिरीकडेही लक्ष असेल. सोबतच रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव यांचा फॉर्मही चांगला असल्याने टीम इंडिया न्यूझीलंडसमोर मोठे आव्हान ठेवण्याची शक्यता आहे.
नेपियरच्या पहिल्या वन डेत निर्विवाद विजय मिळवत न्यूझीलंड दौऱ्यात शानदार सलामी दिली आहे. तीच टीम इंडिया आपलं फिरकी अस्त्र परजून दुसऱ्या वन डे सामन्यासाठी सज्ज झाली आहे. नेपियरच्या मैदानात किवी फलंदाजांनी भारताच्या फिरकी आक्रमणासमोर सपशेल लोटांगण घातलं होतं. त्यामुळं दुसऱ्या वन डेत टीम इंडियाची मदार ही प्रामुख्यानं कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहलच्या फिरकी माऱ्यावर आहे. त्यांच्या साथीला ऑफ स्पिनर केदार जाधव संघात आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -