वेलिंग्टन : टीम इंडियानं वेलिंग्टनच्या पाचव्या वन डेत न्यूझीलंडला विजयासाठी 253 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात भारतीय संघानं 50 षटकांत सर्वबाद 252 बाद धावांची मजल मारली. अंबाती रायुडूनं विजय शंकरच्या साथीनं 98 धावांची आणि केदार जाधवच्या साथीनं 74 धावांची भागीदारी रचून भारताच्या डावाची उभारणी केली. शेवटी हार्दिक पंड्याने केलेल्या जोरदार फटकेबाजीमुळे भारताच्या डावाला आकार मिळाला.
या सामन्यात न्यूझीलंडच्या हेन्री निकोलस आणि ट्रेण्ट बोल्टनं टीम इंडियाची चार बाद 18 अशी दाणादाण उडवली होती. त्या कठीण परिस्थितीत अंबाती रायुडू आणि विजय शंकरनं संयमानं खेळ करून भारतीय डावाला आकार दिला. विजय शंकरचं अर्धशतक पाच धावांनी, तर रायुडूचं शतक दहा धावांनी हुकलं. रायुडूनं नव्वद धावांच्या खेळीला आठ चौकार आणि चार षटकारांचा साज चढवला. त्याला विजय शंकरने 45 तर केदार जाधवने 34 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. शेवटी हार्दिक पंड्याने 22 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांसह 45 धावांची खेळी केली.
INDvsNZ : टीम इंडियाचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय
दरम्यान, न्यूझीलंड दौऱ्यातील पाचव्या वन डे सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर रोहित शर्मा 2 तर शिखर धवन 6 धावांवर बाद झाले. तर यांनतर आलेल्या शुभमन गिल (7) आणि महेंद्रसिंग धोनीला (1) देखील मोठी खेळी करता आली नाही. या सामन्यात महेंद्रसिंह धोनी तंदुरुस्त झाल्याने दिनेश कार्तिकच्या जागी त्याला संधी देण्यात आली आहे. तर खलीलच्या जागी मोहम्मद शमी आणि कुलदीप यादवच्या जागी विजय शंकरला खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
टीम इंडियानं सुरुवातीचे लागोपाठ तीन सामने जिंकून पाच सामन्यांची मालिका आधीच खिशात घातली आहे. पण हॅमिल्टनच्या चौथ्या वन डेत न्यूझीलंडनं भारताचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. त्या वन डेत किवी गोलंदाजांनी टीम इंडियाचा अवघ्या 92 धावांत खुर्दा उडवून, भारतीय फलंदाजांची अब्रू वेशीवर टांगली होती. हॅमिल्टनच्या त्याच लाजिरवाण्या पराभवाचा वचपा काढण्याच्या निश्चयानं टीम इंडिया वेलिंग्टनच्या मैदानात दाखल झाली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत शेवटचा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याचं मोठं आव्हान टीम इंडियाच्या खेळाडूंसमोर असणार आहे. भारतानं ही मालिका 3-1 ने मालिका आधीच खिशात घातली आहे.
संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अंबाती रायुडू, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, विजय शंकर, शुभमन गिल, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, रविंद्र जाडेजा आणि हार्दिक पंड्या.
न्यूझीलंड : केन विलियमसन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम लॅथम, कोलिन डी ग्रँडहोम, ट्रेंट बोल्ट, हेनरी निकोल्स, टाड एस्टल, मॅट हेनरी, कोलिन मुनरो, जिम्मी नीशाम, मिशेल सेन्टनर
INDvsNZ : न्यूझीलंडसमोर 253 धावांचे आव्हान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Feb 2019 11:02 AM (IST)
विजय शंकरचं अर्धशतक पाच धावांनी, तर रायुडूचं शतक दहा धावांनी हुकलं. रायुडूनं नव्वद धावांच्या खेळीला आठ चौकार आणि चार षटकारांचा साज चढवला. तर शेवटी हार्दिक पंड्याने 22 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांसह 45 धावांची खेळी केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -