पर्थ : विराट कोहलीच्या टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या पर्थ कसोटीत पराभवाला सामोरं जावं लागलं. ऑस्ट्रेलियाने भारतावर 146 धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 287 धावांचं आव्हान दिलं होतं. पण त्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव अवघ्या 140 धावांत आटोपला. त्यामुळे चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

भारताकडून रिषभ पंत आणि अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 30 धावांची खेळी केली. पण त्याशिवाय एकाही भारतीय फलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आला नाही.

भारताच्या दुसऱ्या डावात पाचही प्रमुख फलंदाजांनी सपशेल निराशा केली. लोकेश राहुल आणि चेतेश्वर पुजारा स्वस्तात माघारी परतले. विराट कोहली आणि मुरली विजयलाही मोठी खेळी उभारता आली नाही.

ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन आणि मिचेल स्टार्कने प्रत्येकी तीन, तर जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

चार दिवसांत काय घडलं? : संबंधित बातम्या

INDvsAUS : पर्थ कसोटीत टीम इंडिया पराभवाच्या छायेत

INDvsAUS : तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाला 175 धावांची आघाडी

INDvsAUS : विराटच्या शतकी खेळीनंतरही टीम इंडियाची अवस्था बिकट

INDvsAUS : कोहली-रहाणेच्या अभेद्य भागीदारीने भारताला सावरलं!

INDvsAUS : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 326 धावांवर आटोपला

IndVSAus पर्थ कसोटी : पहिल्या दिवसअखेर कांगारु सहा बाद 277 धावांवर