लंडन : इंग्लंड दौऱ्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला 4-1 असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. शेवटच्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीनं म्हटलं की, "आम्ही 4-1नं मालिक गमावली याचा अर्थ आम्ही वाईट खेळलो असा होत नाही. आम्ही चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं."
इंग्लंडने आमच्यापेक्षा चांगल्या खेळ केला. लॉर्डवरील सामना सोडता इतर चार सामन्यांमध्ये आम्ही चांगले खेळलो. कागदावर आम्ही पराभूत झालो असलो तरी, कसोटी मालिकेत खेळ कसा झाला हे दोन्ही संघांना चांगलं माहिती आहे, असंही कोहली म्हणाला.
इंग्लंडचा फलंदाज अलिस्टर कूकचा हा शेवटचा सामना होता. विराट कोहलीने कूकला यशस्वी कसोटी कारकिर्दीबद्दल त्याला शुभेच्छा दिल्या. कूकने आपल्या शेवटच्या कसोटी समान्यात शतक ठोकलं, त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीचा शेवटही गोड झाला.
कूकने कसोटी क्रिकेटला निरोप दिल्यानंतर म्हटलं की, क्रिकेट कारकिर्दीत चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव मिळाले. क्रिकेटमधील मोठी कारकिर्द आणि अनेक क्षण सदैव स्मरणात राहतील. हा आठवडा अविस्मरणीय होता. मी क्रिकेटमधून ताठ मानेने दूर जात आहे, याचा मला आनंद आहे, अशा शब्दात कूकने आपल्या भावना व्यक्त केल्या.
ओव्हल कसोटीत इंग्लंडने भारताचा धावांनी 118 धावांनी पराभव करून, पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 4-1 असा विजय साजरा केला. दुसऱ्या डावात इंग्लंडने भारताला विजयासाठी 464 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र भारताचा दुसरा डाव 345 धावांत आटोपला.
संबंधित बातम्या :