Virat Kohli And Glenn Maxwell : ऑस्ट्रेलियाने 20 वर्षांनी पुन्हा एकदा ((World Cup Final) टीम इंडियाला मात देत सहाव्यांदा वर्ल्डकप उंचावला. त्यामुळे स्पर्धेत धमाकेदार पराभव करूनही टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. वर्ल्डकप उंचावल्याने टीम इंडियाचा चेहरा पडणं स्वाभाविक आहे अन् ऑस्ट्रेलियाचं जंगी सेलिब्रेशन स्वाभाविक झालंच. मात्र, दोन्ही संघातील खेळाडू आयपीएलमध्ये जीवाभावाचे साथीदार असल्याने त्या मैत्रीचे दर्शनही अंतिम सामन्यानंतर झाले. 






रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचे सहकारी किंग विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर एकमेकांना मिठी मारली. तसेच मॅक्सवेलला आपली जर्सी सुद्धा भेट दिली. ज्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आयसीसीने सुद्धा तेच फोटो शेअर करत एकमेकांबद्दल आदर असल्याचे म्हटले आहे.






नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला. सामना संपल्यानंतर एकीकडे ऑस्ट्रेलियन खेळाडू आनंदाने उड्या मारत एकमेकांना मिठी मारत होते. दुसरीकडे, भारतीय खेळाडूंचे दु:खी झाले होते आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू होते.






दोन्ही संघातील खेळाडूंनी हस्तांदोलन केल्यानंतर कोहली आणि मॅक्सवेलने एक खास क्षण शेअर केला, जेव्हा भारतीय फलंदाजाने इंडियन प्रीमियर लीगमधील आपल्या संघसहकाऱ्याला जर्सी भेट दिली.




विराट कोहलीने 54 धावांची खेळी खेळून महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे भारताला एकूण 240 धावा करता आल्या. कर्णधार पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर तो आऊट झाल्याने तो थोडा दुर्दैवी होता. त्याने चेंडूचा बचाव करण्याचा प्रयत्न केला पण बॅटची कट घेऊन गेलेला चेंडू स्टम्पवर आदळला, आणि टीम इंडियापासून वर्ल्डकपही दूर गेला. 


इतर महत्वाच्या बातम्या