Indian Football Team FIFA Nations Cup 2022 : क्रिकेटवेड्या देशात अलीकडे फुटबॉल हा खेळही प्रसिद्धी मिळवत आहे. आता भारतीय फुटबॉल संघाने ई फिफा नेशन्स कप 2022 (Fifa Nations Cup 2022) या भव्य स्पर्धेसाठी पात्रता मिळवत इतिहास रचला आहे. इतिहासात पहिल्यांदाच भारत या स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये खेळणार आहे. ही स्पर्धा पुढील महिन्यात 27 ते 30 जुलै या दिवसांत डेन्मार्क शहराच्या कोपेनहेगनमध्ये खेळवली जाणार आहे. भारताने प्लेऑफमध्ये कोरिया आणि मलेशिया या संघाना मात देत पात्रता मिळवली आहे.


फिफा नेशन्स कप च्या यंदाच्या सीजनमध्ये भारत आशिया/ओशिनिया क्षेत्रात होता. भारताला प्ले-इन्समध्ये स्थान दिलं गेलं होतं. यावेळी प्लेऑफमध्ये भारताला एन्ट्री मिळाली होती.  प्ले-इनच्या दरम्यान भारताने 32 सामने खेळले, ज्यातील 12 सामने जिंकत, 11 मध्ये भारत पराभूत झाला. तर 9 सामने अनिर्णीत ठरले. संपूर्ण 4 साने भारताने डिविजन 1 मध्ये स्थान कायम ठेवलं.  ज्यामुळे सत्राच्या अखेरीस भारत वर्ल्ड रँकिंगमध्ये 19 व्या नंबरवर राहिला आणि दिमाखात पात्रता मिळवली. यावेळी भारताने चरणजोत सिंह, सिद्ध चंदराना आणि सारांश जैन यांच्या खेळीच्या मदतीने कोरिया आणि मलेशिया सारख्या संघाना मात देत ही पात्रता मिळवली आहे.


2021 मध्ये पात्रतेपासून थोडक्यात हुकला भारत


भारतीय फुटबॉल संघाची या स्पर्धेसाठीची यात्रा जानेवारी 2021 मध्ये सुरु झाली. त्यावेळी एआयएफएफने फिफा नेशन्स सीरीज 2021 साठी फिफासोबत भागीदारी केली. भारत या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 60 देशांमध्ये होता, मध्य पूर्व आणि आफ्रिका क्षेत्रात भारताला ठेवण्यात आलं होतं. भारत त्याच्या क्षेत्रात तिसऱ्या स्थानावर होता. केवळ एका स्थानाच्या फरकाने भार फिफा नेशन्स प्लेऑफ 2021 मध्ये स्थान मिळवण्यारपासून हुकला. भारताने ते वर्ष 22 या वर्ल्ड रँकिंगवर संपवलं.  



हे देखील वाचा-