साऊदम्पटन : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत पहिल्या दिवशीच्या पहिल्याच सत्रात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या वरच्या फळीतील फलंदाजीचं कंबरडं मोडलं. पहिल्या सत्राअखेर इंग्लंडचे चार फलंदाज माघारी परतले होते आणि धावसंख्या केवळ 57 होती.
साधारणपणे भारतीय गोलंदाजीला कसोटीत सरासरीपेक्षा कमीच मानलं जातं. मात्र यावेळी भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर इंग्लंडचा निभाव लागला नाही. भारतीय गोलंदाजांनी असा विक्रम केला, जो गेल्या 100 वर्षात कधीही पाहायला मिळाला नाही.
भारताच्या वेगवान गोलंदाजांनी चार कसोटी सामन्यांमधील आतापर्यंतच्या सात डावांमध्ये 42 विकेट घेतल्या आहेत. 43 च्या स्ट्राईक रेटने या विकेट घेतल्या आहेत, जो एक विक्रम आहे. यापूर्वी 1997 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी 45 च्या स्ट्राईक रेटने इंग्लंडच्या 77 विकेट घेतल्या होत्या.
भारतीय वेगवान गोलंदाजांचं नेतृत्त्व इशांत शर्मा करत आहे, ज्याने आतापर्यंत (चौथ्या कसोटीचं पहिलं सत्र) 12 विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर 10 विकेटसह हार्दिक पंड्या, तर जसप्रीत बुमराच्या खात्यात नऊ विकेट जमा झाल्या आहेत.
यापूर्वी 1986 साली भारतीय वेगवान गोलंदाजांनी तीन सामन्यांच्या मालिकेत 41 विकेट घेतल्या होत्या आणि 51.2 चा स्ट्राईक रेट होता.
इंग्लंडमध्ये भारतीय गोलंदाजांची गेल्या 100 वर्षातली सर्वोत्तम कामगिरी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Sep 2018 11:11 AM (IST)
यावेळी भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर इंग्लंडचा निभाव लागला नाही. भारतीय गोलंदाजांनी असा विक्रम केला, जो गेल्या 100 वर्षात कधीही पाहायला मिळाला नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -