नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध होणारी वन डे आणि टी-ट्वेन्टी मालिका तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीचं भारताच्या ट्वेन्टी-ट्वेन्टी संघात पुनरागमन झालं आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतून ऋषभ पंतला वगळण्यात आलं आहे.
धोनीसह दिनेश कार्तिकलाही वन डे मालिकेत संधी देण्यात आली आहे. 2019 मध्ये होणाऱ्या विश्वचषकाला समोर ठेऊन दिनेश कार्तिकला पर्यायी यष्टिरक्षक म्हणून संधी देण्यात आली आहे. धोनी आणि कार्तिक व्यतिरिक्त ऋषभ पंतचाही न्यूझीलंड विरुद्ध टी-20 मालिकेत समावेश करण्यात आला आहे. मात्र वन डे मालिकेतून त्याला वगळण्यात आलं आहे.
दरम्यान 23 जानेवारीपासून भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होईल. तर 12, 14 आणि 17 जानेवारीला भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये वन डे सामने खेळवण्यात येतील.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय वन डे संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार ), लोकेश राहुल, शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद आणि मोहमद शमी.
न्यूझीलंड दौऱ्यासाठी टी-20 संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक), केदार जाधव, हार्दिक पांड्या, क्रूणाल पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि खलील अहमद.
टी-ट्वेन्टी संघात धोनीचं पुनरागमन, भारतीय संघाची घोषणा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Dec 2018 08:37 PM (IST)
अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीचं भारताच्या ट्वेन्टी-ट्वेन्टी संघात पुनरागमन झालं आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतून ऋषभ पंतला वगळण्यात आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -