Athletics in Commonwealth Games 2022 : भारताला स्वांतत्र्य मिळण्यापूर्वीपासून कॉमनवेल्थ खेळांमध्ये (Commonwealth games) भारतीय खेळाडू सहभाग घेत आहेत. पण असं असतानाही अॅथलेटिक्समध्ये पहिलं पदक मिळवण्यासाठी भारताला बरीच वर्षे वाट पाहावी लागली. 1958 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये फ्लाईंग शिख म्हणून प्रसिद्ध मिल्खा सिंह यांनी 440 यार्ड शर्यतीत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर 2002 पर्यंत म्हणजेच 44 वर्षांच्या कालावधीत भारताला अॅथलेटिक्समध्ये काहीच पदकं मिळाली. 2010 साली उत्तम कामगिरीनंतर पुन्हा मधल्या काळात भारताला अॅथलेटिक्समध्ये खास कामगिरी करता येत नव्हती. पण नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताने अॅथलेटिक्समध्ये 8 पदकं मिळवत पुन्हा एकदा अॅथलेटिक्समध्ये भारताला अच्छे दिन आणून दिले आहेत. 


बर्मिंगहम कॉमनवेल्थ पूर्वी म्हणजेच 1934 ते 2018 पर्यंत भारताने 19 वेळा कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभाग घेतला होता. या दरम्यान भारताने अॅथलेटिक्समध्ये केवळ 28 पदकं जिंकली होती. यामध्येही 2010 सालच्या दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने 12 पदकं अॅथलेटिक्समध्ये जिंकली. ज्यानंतर 2014 आणि 2018 साली प्रत्येकी 3-3 पदकंच भारताने जिंकली आहेत. पण यंदा मात्र भारताने अॅथलेटिक्समध्ये 8 पदकं जिंकत चांगली कामगिरी केली. 


भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा यंदा दुखापतीमुळे स्पर्धेला मुकल्याने भारताचं एक जवळपास निश्चित असणारं गोल्ड हुकलं. पण तरी अॅथलेटिक्समध्ये भारताने 8 पदकं जिंकली. यामध्ये एका सुवर्णपदकासह 4 रौप्य आणि 3 कांस्यपदकांचा समावेश होता. विशेष म्हणजे ट्रीपल जम्पमध्ये भारताने गोल्ड आणि सिल्वर दोन्ही मिळवले. याल एलडॉस पॉल आणि अब्दुला अबुबकर यांनी अनुक्रमे ही पदकं जिंकली. तर स्टीपलचेसमध्ये अविनाश साबळे आणि 10 किमी चालण्याच्या शर्यतीत प्रियांका गोस्वामी यांनी रौप्य पदकं मिळवली. तर 10 किमी चालण्याच्या शर्यतीत कांस्यपदक संदीप कुमारने मिळवलं. याशिवाय हाय जम्पमध्ये एम श्रीशंकर, तेजस्वीन शंकर यांनी आणि भालाफेकमध्ये  अन्नू राणी हिने कांस्य पदक जिंकलं. यावेळी भारताच्या अविनाश साबळे आणि प्रियांका गोस्वामी यांनी त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. तर ट्रीपल जम्पमध्ये एकाच खेळात दोन पदकं जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरीही भारताने केली.


हे देखील वाचा-