England women vs india women test: भारतीय महिला क्रिकेट आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघादरम्यान कसोटी सामना सुरु झाला आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सावध सुरुवात केली आहे. दुसऱ्या सत्रात इंग्लंडच्या महिलांनी 35 षटकात 1 विकेट गमावत 109 धावा केल्या आहेत. भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला ब्रिस्टल येथे एकमेव कसोटी सामना खेळत आहेत. ब्रिस्टल मैदानावर जर भारतीय महिला संघ विजयी झाला तर तो लागोपाठ चौथा विजय असेल आणि तो एक नवा विक्रम देखील असेल. ऑस्ट्रेलिया महिला संघ वगळता बाकी कोणत्याही महिला संघाने लागोपाठ 3 कसोटी सामने जिंकलेले नाहीत.


भारतीय महिला संघाचं नेतृत्त्व मिताली राजकडे आहे.  भारतीय महिला संघ जवळ जवळ 7 वर्षांनंतर कसोटी क्रिकेट खेळत आहे. इंग्लंड महिला संघाने सुद्धा गेली काही वर्षे कसोटी क्रिकेट खेळलेले नाही.  इंग्लंड 96  कसोटी सामना खेळत आहे तर भारतीय महिला संघ 37 वा कसोटी सामना खेळत आहेत. या एकमेव कसोटी सामन्यानंतर दोन संघांमध्ये टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. 


भारतीय संघात पाच खेळाडूंचं पदार्पण 
भरतीय टीममध्ये शेफाली वर्मासह  दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकर आणि तानिया भाटिया स्नेह यांनी पदार्पण केलं आहे.  भारतीय महिला संघानं याआधी शेवटची कसोटी  2014 मध्ये साउथ आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना खेळला होता. मागील तीनही कसोटी सामन्यात भारतीय महिलांनी विजय मिळवला आहे. यापैकी इंग्लंडविरुद्ध 2006 आणि 2014 मध्ये खेळलेल्या दोन सामन्यात भारतीय महिला संघाने विजय मिळवला होता.


इंग्लंडने घरच्या मैदानावर 8 कसोटी सामन्यांत भारतीय महिला संघाशी मुकाबला केला आहे. त्यांना घरच्या मैदानावर भारतीय महिला संघाविरुद्ध एकही विजय मिळवता आलेला नाही.


भारतीय प्लेईंग इलेव्हन
स्मृति मानधना, शेफाली वर्मा, पूनम राउत, मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, दीप्ति शर्मा, स्नेह राणा, तानिया भाटिया (विकेटकीपर), झूलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, शिखा पांडे 


इंग्लंड प्लेईंग इलेव्हन
लॉरेन विनफील्ड हिल, टॅमी ब्यूमोंट, हीथर नाइट (कर्णधार), नताली सायवर, एमी एलेन जोन्स (विकेटकीपर), सोफिया डंकले, जॉर्जिया एल्विस, कॅथरीन ब्रंट, अन्या श्रुबसोल, सोफी एक्लेस्टोन, केट क्रॉस