अँटिगा (वेस्ट इंडिज): वेस्ट इंडिजचे महान फलंदाज व्हिवियन रिचर्ड्स यांना भेटून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याचे शिलेदार धन्य झाले आहेत. व्हिव रिचर्ड्स टीम इंडियाच्या शिलेदारांना भेटण्यासाठी स्वत: त्यांच्या अँटिगातील हॉटेलात दाखल झाले होते.

 

भारतीय संघाच्या विंडीज दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्याला 21 जुलैपासून अँटिगात म्हणजे रिचर्ड्स यांच्याच गावात सुरुवात होत आहे. या कसोटीच्या पार्श्वभूमीवरच टीम इंडियासोबतच्या रिचर्डसच्या भेटीचा योग जुळून आला.

 

'वेस्ट इंडिजचे महान फलंदाज व्हिव रिचर्डस यांच्यासोबतच्या भेटीचा क्षण अविस्मरणीय होता. त्यांच्याकडून मिळालेला सल्ला हा माझ्यासाठी अनमोल होता', या शब्दात विराट कोहलीने रिचर्ड्स यांच्यासोबतच्या भेटीचं वर्णन केलं.

 

https://twitter.com/imVkohli/status/755247067350564864

 

विराटसह शिखर धवन, अजिंक्य रहाणे, मुरली विजय आणि लोकेश राहुल यांनीही रिचर्ड्स यांच्यासोबतच्या भेटीचा लाभ घेतला.

 

https://twitter.com/BCCI/status/755203387839348736