India vs Sri Lanka T20: भारत आणि श्रीलंकेदरम्यान खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यातं श्रीलंकेनं चार विकेट्सने विजय मिळवला. रोमांचक झालेल्या या सामन्यात श्रीलंकेनं विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली आहे. आज लगेच तिसरा आणि अंतिम टी20 सामना खेळला जाणार आहे. आज रात्री आठ वाजता कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे.
दुसऱ्या सामन्याआधी क्रुणाल पांड्या कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर क्रुणाल सह भारताचे 8 खेळाडू आयसोलेशनमध्ये आहेत. माहितीनुसार क्रुणाल पांड्या कोविड पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील 8 खेळाडूंना देखील आयसोलेशनमध्ये जाण्यास सांगितलं आहे. पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, देवदत्त पडिकल, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, कृष्णप्पा गौतम हे खेळाडू दुसऱ्या टी20 सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळं दुसऱ्या सामन्यात अंतिम 11ची निवड करताना देखील चांगलीच दमछाक झाली. हीच स्थिती तिसऱ्या सामन्यात देखील असणार आहे. एकाचवेळी 9 खेळाडू आयसोलेशनमध्ये गेल्यानं टीम इंडियासमोर प्लेईंग इलेव्हनची निवड करणं कठिण झालं आहे.
Ind vs SL 2nd T20I : दुसऱ्या टी-20 मध्ये भारताचा श्रीलंकेकडून चार विकेटने पराभव
संघात केवळ पाच फलंदाज आहेत तर सहा गोलंदाजांना घेऊन टीम इंडियाला खेळावं लागत आहे. देवदत्त पडिकल, नितीश राणा, ऋतुराज गायकवाड, चेतन साकरीया या खेळाडूंचं काल पदार्पण झालं. आज ईशान पोरेल, संदीप वारियर, अर्शदीप सिंह, साई किशोर आणि सिमरजीत सिंह यांच्यापैकी एकाला देखील संधी मिळण्याची शक्यता आहे.
आजच्या सामन्यात देखील ऋतुराज गायकवाड शिखर धवनसोबत सलामीला येण्याची शक्यता आहे. मात्र मध्यक्रमात फलंदाजांची निवड करणं कठिण होणार आहे. भारतासाठी आतापर्यंत हा दौरा चांगला ठरला आहे. वनडे मालिका जिंकल्यानंतर भारतानं पहिली टी 20 मॅच देखील जिंकली होती. दुसरा टी 20 सामना 27 तारखेला खेळला जाणार होता मात्र क्रुणाल पांड्या कोरोना पॉझिटीव्ह झाल्यानं हा हा सामना एक दिवस पुढे ढकलण्यात आला.