रोहितनं सुरुवातील शिखर धवनच्या साथीनं ११५ धावांची, तर श्रेयस अय्यरच्या साथीनं ११३ धावांची भागीदारी रचली. त्यामुळंच भारतानं ५० षटकांत दोन बाद 393 धावांचा डोंगर उभारला.
सलामीवर शिखर धवननं ६७ चेंडूंत नऊ चौकारांसह ६८ धावांची खेळी उभारली. तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या श्रेयस अय्यरनं ७० चेंडूंत नऊ चौकार आणि दोन षटकारांसह ८८ धावांची खेळी केली.
रोहित शर्मानं वनडेत तीन द्विशतकं कुठे-कुठे झळकावली
------------
- भारताविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताने आजच्या सामन्यात एक बदल केला आहे.
- कर्णधार रोहित शर्माची द्विशतकाकडे वाटचाल
- INDvsSL : कर्णधार रोहित शर्माचं शानदार शतक, 115 चेंडूत 100 धावा
- INDvsSL : मोहाली वनडेत सलामीवीर धवनचं खणखणीत अर्धशतक, भारत 76/0 (15 ओव्हर)
फिरकीपटू कुलदीप यादवऐवजी 18 वर्षीय अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली आहे.
आजचा सामना मोहालीच्या पीसीए स्टेडियमवर खेळवण्यात येतोय. टीम इंडियाला तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधायची असेल, तर हा सामना जिंकावाच लागेल.
श्रीलंकेने पहिल्या वन डेत सात विकेट्सनी दणदणीत विजय मिळवून, तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे या मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला हा सामना जिंकावाच लागेल.
मोहालीच्या दुसऱ्या वन डेवरही वेगवान गोलंदाजांचं वर्चस्व दिसून येईल, अशी अपेक्षा आहे. पण मोहालीत धरमशालाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भारतीय फलंदाजांना या सामन्यात नेटानं खेळावं लागेल.
वॉशिंग्टन सुंदर
वॉशिंग्टन सुंदर हा तामिळनाडूचा अष्टपैलू खेळाडू आहे. 5 ऑक्टोबर 1999 रोजी जन्मलेला वॉशिंग्टन अवघ्या 18 वर्षांचा आहे. आयपीएलमध्ये त्याने गेल्या मोसमात रायझिंग पुणेकडून खेळताना चमकदार कामगिरी केली होती. याशिवाय देशांतर्गत सामन्यांमध्येही त्याने उत्तम कामगिरी केली. त्याचंच फळ वॉशिंग्टनला मिळालं आणि त्याची भारतीय संघात निवड झाली.
वॉशिंग्टन सुंदर उजव्या हाताने फिरकी गोलंदाजी करतो, तर डाव्या हाताने फलंदाजी करतो.
https://twitter.com/BCCI/status/940813917042995200
https://twitter.com/BCCI/status/940813917042995200