कोलंबो : भारताने श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वन डेतही दणदणीत विजय मिळवला. विराट कोहलीच्या टीम इंडियाने श्रीलंकेवर 168 धावांनी मात करुन मालिकेत 4-0 ने आघाडी घेतली.


विराट कोहलीच्या टीम इंडियाने कोलंबोतल्या चौथ्या वन डेत श्रीलंकेला विजयासाठी 50 षटकांत 376 धावांचं आव्हान दिलं होतं. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांनी झळकावलेल्या शतकांच्या जोरावर भारताने या सामन्यात 50 षटकांत पाच बाद 375 धावांची मजल मारली.

विराट आणि रोहितने दुसऱ्या विकेटसाठी 219 धावांची भागीदारी रचून भारतीय डावाचा भक्कम पाया घातला. त्यानंतर मनीष पांडे आणि महेंद्रसिंग धोनीने सहाव्या विकेटसाठी 101 धावांची अभेद्य भागीदारी रचली.

पांडे 50, तर धोनी 49 धावांवर नाबाद राहिला. त्याआधी, या सामन्यात सलामीचा शिखर धवन स्वस्तात माघारी परतला. पण विराटने 96 चेंडूंत 17 चौकार आणि दोन षटकारांसह 131 धावांची खेळी उभारली. रोहितने 88 चेंडूंत 11 चौकार आणि तीन षटकारांसह 104 धावांची खेळी उभारली.

कर्णधार विराट कोहलीपाठोपाठ शतकं ठोकून सलामीवीर रोहित शर्मा, हार्दिक पांड्या  आणि के एल राहुल माघारी परतले.

रोहित शर्माने 85 चेंडूत शतक पूर्ण केलं. मात्र मॅथ्यूजने हार्दिक पांड्याला 19 धावांवर माघारी धाडल्यानंतर, पुढच्याच चेंडूवर रोहित शर्मालाही बाद केलं. रोहित शर्माने 88 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकार ठोकून 104 धावा केल्या.

त्यानंतर अकिला धनंजयने के एल राहुलला अवघ्या 7 धावांवर तंबूत धाडलं.

तत्पूर्वी महेंद्रसिंग धोनीच्या कारकीर्दीतल्या तीनशेव्या वन डे सामन्याचं विराट कोहली आणि रोहित शर्मानं शानदार डबल सेलिब्रेशन केलं. टीम इंडियाच्या या कर्णधार आणि उपकर्णधाराच्या जोडीनं कोलंबोच्या चौथ्या वन डेत शतकं झळकावून भारतीय डावाला मजबुती दिली.

या सामन्यात सलामीचा शिखर धवन स्वस्तात माघारी परतला. पण विराट आणि रोहितनं दुसऱ्या विकेटसाठी 219 धावांची भागीदारी रचली. त्यात विराटचा वाटा 96 चेंडूंत 17 चौकार आणि दोन षटकारांसह 131 धावांचा होता. रोहितनं 88 चेंडूंत 11 चौकार आणि तीन षटकारांसह 104 धावांची खेळी उभारली