मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्माच्या आगामी 'परी' चित्रपटाच्या सेटवर एका तंत्रज्ञाला प्राण गमवावे लागले आहेत. लाईव्ह वायरच्या संपर्कात आल्यामुळे विजेचा धक्का बसून शहाबे आलम नामक व्यक्तीचा मृत्यू झाला.
'परी' चित्रपटाच्या सेटवर लाईटिंग डिपार्टमेंटमध्ये टेक्निशियन म्हणून शहाबे काम करत होता. पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात या सिनेमाचं शूटिंग सुरु होतं. आऊटडोअर शूटिंगच्या वेळी शहाबे लाईव्ह वायरच्या संपर्कात आला. शॉक लागल्यानंतर शहाबेला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
बांबूच्या एका बनात 'परी' चित्रपटातील सीन शूट करण्यात येत होता. मुख्य व्यक्तिरेखांना हायलाईट करण्यासाठी दिवे लावण्यात आले होते. त्यापैकी एखाद्या वायरमधून त्याला विजेचा धक्का बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शहाबेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
या घटनेनंतर परी चित्रपटाचं शूटिंग तात्पुरतं थांबवण्यात आलं होतं. दिग्दर्शक प्रॉसित रॉय यांचं पदार्पण असलेला 'परी' हा चित्रपट हॉरर लव्ह स्टोरी आहे. अनुष्कासोबत बंगाली अभिनेता परंब्रता चौधरीही या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.
अनुष्का शर्माच्या सिनेमाच्या सेटवर एकाचा शॉक लागून मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Aug 2017 03:00 PM (IST)
अनुष्का शर्माची मुख्य भूमिका असलेल्या 'परी' सिनेमातील मुख्य व्यक्तिरेखांना हायलाईट करण्यासाठी सेटवर दिवेलावण्यात आले होते. त्यापैकी एखाद्या वायरमधून त्याला विजेचा धक्का बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -