कॅण्डी : विराट कोहलीच्या टीम इंडियाने गॉल आणि कोलंबो कसोटी सामन्यांपाठोपाठ श्रीलंका दौऱ्यातली कॅण्डी कसोटीही जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. भारताने श्रीलंकेचा दुसरा डाव 181 धावांत गुंडाळून, कॅण्डीच्या तिसऱ्या कसोटीत एक डाव आणि 171 धावांनी विजय साजरा केला.
भारताने या विजयासह तीन कसोटी सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली आहे. भारताच्या कसोटी क्रिकेटच्या 85 वर्षांच्या इतिहासात टीम इंडियाने परदेशात क्लीन स्विप मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दरम्यान, शिखर धवन, हार्दिक पंड्या यांच्या दमदार शतकामुळे भारताने जबरदस्त खेळी करत पहिल्या डावात 487 धावांची मजल मारली होती. त्यानंतर टीम इंडियाने श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 135 धावांत गुंडाळून, यजमानांवर फॉलोऑन लादला. त्यामुळे भारताकडे तब्बल 352 धावांची आघाडी होती.
कसोटीच्या तिसऱ्या दिवशी एक बाद 19 धावांवरुन सुरुवात करणाऱ्या श्रीलंकेचा दुसरा डाव अवघ्या 181 धावांवर आटोपला. भारताकडून आर अश्विनने 4 मोहम्मद शमीने 3, उमेश यादवने 2 तर कुलदीप यादवने प्रत्येकी एक विकेट घेतली.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 304 धावांनी विजय मिळवला होता. दुसरा सामना एक डाव आणि 53 धावांनी जिंकला होता. तर अखेरच्या कसोटीत भारताने एक डाव आणि 171 धावांनी मोठा विजय संपादन केला.
संबंधित बातम्या
टीम इंडियाची नवी सेलिब्रेशन स्टाईल, काय आहे ‘Daddy D’ pose?
कँडी कसोटीत हार्दिक पंड्याचं झंझावाती शतक, श्रीलंकेवर फॉलोऑनची नामुष्की
शतकी खेळीसोबतच हार्दिक पंड्याचे 6 विक्रम
5 चेंडूत 26 धावा, पंड्याचं कसोटीत वादळी शतक
भारतीय गोलंदाजांकडून श्रीलंकेचा अवघ्या 135 धावांत खुर्दा
कसोटीत सलग 7 अर्धशतकं, राहुलने दिग्गजांचे विक्रम मोडले
मी धोनीकडून बरंच काही शिकलो : हार्दिक पंड्या
INDvsSL : भारताचा लंकेवर मालिका विजय, 85 वर्षांनी इतिहास रचला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Aug 2017 02:47 PM (IST)
विराट कोहलीच्या टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्यात नवा इतिहास घडवला. भारताच्या कसोटी क्रिकेटच्या 85 वर्षांच्या इतिहासात टीम इंडियाने परदेशात क्लीन स्विप मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -