कोलंबो : कोलंबो कसोटीतील दुसऱ्या डावात श्रीलंकेने शानदार फलंदाजीचं प्रदर्शन घडवताना चौथ्या दिवशी उपहारापर्यंत 4 बाद 302 धावा केल्या. सलामीवीर करुणारत्नेने धडाकेबाज नाबाद शतक झळकावलं.
टीम इंडियाने पहिल्या डावात 439 धावांची आघाडी घेतली होती. मात्र श्रीलंकेने दुसऱ्या डावात बहारदार फलंदाजी करुन भारताचा विजय लांबवला.
पहिल्या डावात पाच विकेट घेणाऱ्या अश्विनच्या फिरकीची जादू दुसऱ्या डावात फिकी पडली. श्रीलंकेचा पहिला डाव 183 धावांमध्ये आटोपला होता. मात्र, या डावात करुणारत्ने आणि मेंडीसच्या शतकांमुळे श्रीलंकेचा डाव सावरला.
INDvsSL : मेंडीस-करुणारत्नेच्या शतकामुळे भारताचा विजय लांबला!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Aug 2017 12:08 PM (IST)
कोलंबो कसोटीतील दुसऱ्या डावात श्रीलंकेने शानदार फलंदाजीचं प्रदर्शन घडवताना चौथ्या दिवशी उपहारापर्यंत 4 बाद 302 धावा केल्या. सलामीवीर करुणारत्नेने धडाकेबाज नाबाद शतक झळकावलं.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -