कोलकाता : श्रीलंकेविरुद्धच्या कोलकातामधील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा पहिला डाव 172 धावांत संपुष्टात आला. कालच्या धावसंख्येत केवळ 98 धावांची भर घालत भारताचा उर्वरीत संघ तंबूत परतला.

भारतातर्फे चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक 52 धावांची खेळी साकारली. रिद्धीमान साहा आणि रविंद्र जाडेजाने सातव्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी रचत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र श्रीलंकेच्या प्रभावी माऱ्यासमोर भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही.

श्रीलंकेच्या सुरंगा लकमलने भारताच्या चार फलंदाजांना माघारी धाडलं. तर दासून शनाका दिलरुवान परेराने आणि लाहिरु गमगेने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

त्याआधी ईडन गार्डन्सवरील या सामन्यात पावसाचा खेळ पाहायला मिळाला. नाणेफेक जिंकून श्रीलंकेने पहिल्यांदा भारताला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. कसोटीच्या पहिल्या दिवशी केवळ 11.5 षटकांचाच खेळ होऊ शकला. भारताने 3 बाद 17 धावा केल्या.

तर दुसऱ्या दिवशी पावसामुळे आणखी 21 षटकांचा खेळ झाला. 32.5 षटकात भारताने 5 बाद 74 धावा केल्या होत्या.

संबंधित बातम्या

LIVE : पावसामुळे खेळ थांबला, पुजाराचा संघर्ष सुरुच

ईडन गार्डन्सवर लकमलची लकाकी, 6 षटकं, 6 निर्धाव, 3 विकेट्स

भारत-श्रीलंका संघामधील पहिल्या कसोटी सामन्यावर पावसाचं सावट