जोहान्सबर्ग : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधल्या जोहान्सबर्ग कसोटीची रंगत सत्रागणिक वाढत चालली आहे. अजिंक्य रहाणे आणि भुवनेश्वर कुमारनं सातव्या विकेटसाठी केलेल्या ५५ धावांच्या भागिदारीनं ही कसोटी आता टीम इंडियाच्या बाजूनं झुकवली आहे. या कसोटीत तिसऱ्या दिवशी भारतानं सात बाद २०३ धावांची मजल मारली आहे. त्यामुळं टीम इंडियाच्या हाताशी १९६ धावांची आघाडी झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटीत वगळण्यात आलेल्या अजिंक्य रहाणेनं या कसोटीत दुसऱ्या डावात 48 धावांची झुंजार खेळी केली. मात्र, त्याचं अर्धशतक अवघ्या दोन धावांनी हुकलं. पण रहाणे आणि भुवनेश्वर कुमारने टीम इंडियाचा बराचसा डाव सावरला.
त्याआधी भारताचा कर्णधार विराट कोहलीनं ४१ धावांची आणि मुरली विजयनं २५ धावांची खेळी केली. त्या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ४३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.