मुंबई : शिवतीर्थावर ध्वजवंदन आणि संचलन सुरु असताना आज एका कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला. परभणीतल्या खान कुटुंबातील आठ जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांच्यासोबत रॉकेलही आणलं होतं.
पोलीस कोठडीत पती समशेर खान यांचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला, पण संबंधित पोलिसांचं अद्यापही निलंबन करण्यात आलं नाही. तसंच आपल्याला कोणतीही आर्थिक मदत देण्यात आली नाही, अशी तक्रार करत समेशर यांची पत्नी अखिला बेगम केली. अखिल बेगम यांच्यासोबत समशेर खान यांचे बंधू यासिन खान आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सहा जणांनी शिवतीर्थावर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
शिवतीर्थावर उपस्थित असलेल्या पोलिसांनी वेळीच कृती करत होऊ घातलेला अनर्थ टाळला. आपण सरकार दरबारी वारंवार प्रकरण कानावर घातलं, पण आपल्याला कोणीही दाद दिली नाही, असा खान कुटुंबियांचा आरोप आहे.
या कुटुंबाने काल आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना परवानगी नाकारण्यात आली. आज त्यांनी राज्यपालांना देण्यासाठी लिहून आणलेलं निवेदनही आणलं होतं. या कुटुंबाला पोलिसांनी ताब्यात घेत, आता शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात चौकशीसाठी थांबवलं आहे.
शिवतीर्थावर संचलन सुरु असताना कुटुंबाचा आत्महदनाचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jan 2018 04:34 PM (IST)
शिवतीर्थावर उपस्थित असलेल्या पोलिसांनी वेळीच कृती करत होऊ घातलेला अनर्थ टाळला. आपण सरकारी दरबारी वारंवार प्रकरण कानावर घातलं, पण आपल्याला कोणीही दाद दिली नाही, असा खान कुटुंबियांचा आरोप आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -